नागपुर (वि.प्र.) - लोकमान्य तिळक जनकल्याण शिक्षण संस्था संचालित ज्योतिबा जूनियर कॉलेज नंदनवन नागपुर येथील वाणिज्य शाखेतील श्वेत सहारे यानी १२ वी महाराष्ट्र बोर्ड च्या परिक्षेत ७९.६७ टक्के गुण प्राप्त केले.७९.६७ टक्के गुण प्राप्त करुण यश संपादन करणारे भरपूर मुले असणार. परंतु श्वेत करता हे येवढे सोपे नव्हते. कारण ११ वी वर्गात असतांना वर्षा च्या अखेर त्याला छाती चे त्रास जानवायला लागले. त्याच्या आई बबिता सहारे जी मार्केटिंग चा काम करते तिने श्वेतची तपासनी करुण घेतली.तेव्हा माहिती पडले की श्वेतचा ब्लड सरकुलेशन शरीराच्या एका भागात जास्त आहे.आणि रक्त पण डाट आहे.श्वेतच्या आई ने ऑपरेशन करुण श्वेतची बीमारी दूर करावी असे निर्णय घेतले.परंतु डॉक्टर नी सांगितले यात भरपूर धोका आहे.तुम्ही औषद चालू ठेवा आणि आता बहुतेक हे आजीवन चालनार.आई,आई असते ती हे ऐकुण घाबर्ली परंतु श्वेत स्वतः आईला धीर बांधू लागला त्यास आत्मशक्ति वर विश्वास होता. डॉक्टर नी काही महीने उपचार केले.आणि दिवाळी नंतर श्वेतला मुंबईला जान्याचा सल्ला दिला. परंतु दिवाळी नंतर १२ वी बोर्ड परिक्षेला काहीच महीने उर्ले होते.श्वेतनी धाडस दाखवत तीन महीने अभ्यासाला वेळ देण्याचा निर्णय घेतला आणि १२ वी च्या अभ्यासाला लागला.श्वेतला जळ काम करने तसेच साईकील चालवन्यास बंधन घालन्यात आले. तरी श्वेतची आई, बहिन तसेच श्वेत चे जूनियर कॉलेज चे शिक्षक त्यास धाडस बांधू लागले आणि श्वेत आपल्या अभ्यासाकडे लक्ष वेदु लागला .त्याला आतुन काय जानवत असणार त्यालाच माहिती परंतु श्वेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श माणतो आणि त्यानी त्यांचे जीवन संघर्ष डोळ्या समोर ठेवून १२ वी बोर्ड परीक्षा प्राविन्य श्रेणित पास केले. याचे श्रेय त्यानी आपल्या आई, बहिन राणी व आपल्या कॉमर्स विभाग शिक्षकांना दिले आहे.
श्वेत सहारेनी आरोग्याला झुंझ देत १२ वी परिक्षेत मिळवले ७९.६७ टक्के गुण .!
byChandikaexpress
-
0