राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठविल्याच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बल्लारपूर शहरात आंदोलन ..!
बल्लारपूर (का. प्र.) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठविल्याच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बल्लारपूर शहरात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष इंजि. राकेश सोमाणी म्हणाले, “जयंत पाटील हे उच्चविद्याविभूषित,चारित्र्यसंपन्न आणि निष्कलंक नेते आहेत. त्यांचे 40 वर्षांचे सार्वजनिक व राजकीय जीवन हे एक खुले पुस्तक आहे. मात्र सध्या त्यांच्यावर राजकीय आकसाने ईडी कारवाई केली जात असल्याच्या संतप्त भावना यावेळी व्यक्त केली.
या 9 वर्षात भाजपच्या एकाही आमदार खासदारांना ईडीची नोटीस आल्याची एकपण बातमी नाही. परंतु महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना जाणून-मधून सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून त्रास देण्याचे काम हे फॅसिस्ट सरकार करत असल्याचा आरोप देखील त्यांनी लावला. “भाजपच्या या लोकशाही विरोधी कारभारास जनता मतदानातून योग्य उत्तर देईल. असा सज्जड इशाराही जिल्हाध्यक्ष सोमाणी यांनी दिला.
“भाजपा वॉशिंग मशीन आणि ईडी वॉशिंग पावडर” याचं प्रात्यक्षिक (NCP) सादर करून भाजपकडून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा कशाप्रकारे वापर केला जातो, हे दाखवण्यात आले. आंदोलनाप्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके,बल्लारपूर शहर अध्यक्ष बादल भाऊ उराडे, व अनेक पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे “ईडी भाजपचा घरगडी” “भाजप हमसे डरती है ईडी को आगे करती है” “भाजपचा हवालदार काय करतो ईडीच्या नोटीस वाटत फिरतो” “ईडी सरकार हाय हाय” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात बल्लारपूर युवक अध्यक्ष अमर धोंगडे, उपाध्यक्ष अजित पडवेकर,सुमित (गोलू)डोहणे,बल्लारपूर शहर अधक्ष बादल भाऊ उराडे, विधानसभा अध्यक्ष शुभांगी साठे,महिला शहर अध्यक्ष मलेश्वरी महेशकर,अर्चना बुटले, कविता बुरचुंडे,माया सातपुते,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष इब्राहिम खान,रवी बेज्जला,इम्रान खान, आरिफ खान, रोहन जामगडे,अंकीत निवलकर,भाग्यवान मेश्राम, नितिन सोयाम, संस्कार सुखदेवे, कुणाल शेरकी,रोशन चौधरी, राहुल रामटेके, शुभम मेश्राम, व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.