श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान अंतर्गत संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.धनराज आस्वले यांचा पुढाकार .!
भद्रावती (ता.प्र.) - स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट हि एक सामाजिक संस्था असून समाजातील गोरगरीब, गरजू, व्यक्ती, शेतकरी यांना न्यासच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक मदत करीत असते. संस्थेच्या उद्देशानुरूप श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान, विदेही सद्गुरू श्री संत जग्गनाथ महाराज जनजागृती व प्रबोधन सामाजिक कार्यक्रम, अनाथांची माय सिन्धुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना, कै. म ना पावडे क्रीडा स्पर्धा असे अभियान उपक्रम राबवित आहे.
संस्थेचे श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर आयोजन, दुर्धर आजारांनी ग्रस्त कॅन्सर रुग्ण यांना औषोधोपचारा करिता आर्थिक सहकार्य करीत असते.
भद्रावती तालुक्यातील मोहबाळा येथील असेच एक रुग्ण ज्योती संजय माशारकर ह्या ब्रेस्ट कॅन्सर रोगांनी ग्रस्थ होत्या. ज्योती यांचा ब्रेस्ट कॅन्सर रोगावर उपचार करून शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. शेतकरी कुटुंब, आर्थिक अडचण, औषोधोपचाराकरिता आर्थिक तंगी हे सर्व बघता संजय मशारकर यांनी सेवा सहकारी संस्था मोहबाळाचे अध्यक्ष राजू पारखी यांची भेट घेतली तसेच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट कडे आर्थिक मदतीकरिता सहकार्याची मागणी केले.
रुग्णाची परिस्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे व कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी तात्काळ संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केले. स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट च्या विश्वस्त सुषमा श्रीनिवास शिंदे यांनी रुग्ण ज्योती यांचे पती संजय माशारकर यांना उपचाराकरिता आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान केला.
यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, सेवा सहकारी संस्था मोहबाळाचे अध्यक्ष राजू पारखी, सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र पढाल, अशोक निखाडे, प्रशांत कारेकर, रोहन कुटेमाटे, घनश्याम आस्वले, वासुदेव ठाकरे, विश्वास कोंगरे तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते व मंडळी उपस्थित होते.