श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प सदुसष्ठावे - डॉक्टर लोबो

शेगांव (वि.प्र.) - सन १९०५ मध्ये शेगाव येथे डॉक्टर यू. एम. लोबो या प्रमुख डॉक्टर म्हणून आल्या. डॉक्टर लोबो ही ख्रिश्चन धर्म सुस्वरूप, मनमिळावू आणि सेवावृत्तीची अशी तरुण डॉक्टर होती. लोबो या निस्वार्थ सेवा करीत होत्या. तेथे आल्यापासूनच त्या गजानन महाराजांच्या संपर्कात आल्या. 
महाराजांची शांत अशी निरंजन वृत्ती, त्यांचा लहान बालकाप्रमाणे असलेला स्वभाव आणि महाराजांमध्ये तिला जे ईश्वरी गुण दिसले त्या आधारे ती महाराजांना देव मानू लागली. तिने जेव्हा महाराजांना प्रथमता बघितले, तेव्हा ती अतिशय प्रभावित झाली. महाराजांच्या नेत्रातील एक आगळवेगळे तेज आणि विलक्षण आश्वासक दृष्टी, चेहऱ्यावरचे शांत आणि प्रसन्न भाव बघून तिला प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण झाली. तिला महाराजांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले ही महाराजांची लीला. पुढे तिला येशूच्या जागी योगीराज गजानन महाराज दिसू लागले आणि तेव्हापासून ती महाराजांची भक्त बनली. डॉक्टर लोबो ही जरी ख्रिश्चन असली तरी महाराजांना तिच्या धर्माचा अडसर वाटला नाही. महाराजांच्या मते ईश्वरप्राप्तीची सुविधा निर्माण करून देणारी ही संहिता होय.
पुढे पूजनीय सईबाई मोटे यांच्या प्रेरणेने आणि सूचनेनुसार रामकृष्ण गोविंदराव मोटे यांनी सईबाई मोटे रुग्णालयाची स्थापना १९१२ मध्ये केली. हा दवाखाना स्थानिक कार्यकर्त्यांच्या सौजन्याने आणि डॉक्टर लोबो यांच्या निस्वार्थ परिश्रमाने कार्यरत राहिला.
डॉक्टर लोबो आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.