'जगू या थोडंसं माणुसकीसाठी, ग्रुपचे सुयश ..!

बल्लारपुर (का.प्र.) - दिनांक 12/05/2023 ला 72 वर्षीय बुजरूक हे अज्ञात व्यक्ती बाबूपेठ नेताजी चौक,चंद्रपुर येथे आढळलं. त्या परिसरातील एका व्यक्तीने आमच्या ग्रुपला संपर्क केला.तो व्यक्ती अत्यंत खराब परिस्थितीमध्ये होता तो व्यक्ती कुठून आला काय आला त्याच्या काही ठाव ठिकाण नव्हता. त्याला बोलण्याच्या होश सुद्धा नव्हता त्यानंतर आम्ही त्यांना पाणी दिलं. त्या नंतर त्याला विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण तो व्यक्ती काही सांगण्याच्या होश मध्ये नव्हता.नंतर थोड्या वेळात त्याला बसवून जेवण दिलं. आणि  जेवण करतांना त्यांच्याशी बोलून विचारपूस केल त्यांनी पूर्ण नाव नारायण रामचंद्र कदम व पत्ता - सातारा डिस्ट्रिक्ट गाव सुरली हे सांगितल. 


थोड्यावेळाने आमचा जगूया थोडंसं माणुसकीसाठी ग्रुप चा माध्यमातून सुरली ग्रामपंचायत मध्ये कॉल केला आणि त्याच गावाचे सरपंच नी आम्हाला पूर्ण घरचा मोबाईल नंबर  सहित माहिती दिली. आणि त्यांच्या आडनावांनी आम्ही संपर्क करून त्यांचा मुलगा मंगेश कदम यांचाशी संपर्क केला त्यांनी सांगितले कि माझेच वडील आहे.नंतर व्हिडीओ कॉल करून मुलगा आणि वडीलाशी बोलन करून दिल्याबदल त्यांचे वडील खुश झाले. नंतर त्या मुलांनी सांगितले कि दोन महिन्यापासून भटकलेले होते.आम्ही त्यांना पूर्ण स्वच्छ करून आंघोळ,दाडी, कटिंग करून त्यांना नवीन कपडे लाऊन दिले. 


नंतर आसरा निवारा येथे संपर्क साधून त्यांना एक दिवस ठेवण्याच्यासाठी गोपाल सरांना रिक्वेस्ट केली . त्यांनी आमचे रिक्वेस्ट मान्य केले. आणि त्यांच्या मुलाशी आम्ही संपर्क साधून इथं लवकरात लवकर येण्यास विनंती केले आम्ही विचारपूस करतेवेळी त्यांनी सांगितले की आमची आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे आम्ही कमीत कमी दहा ते पंधरा दिवस येऊ शकणार नाही. त्यांच्या डिस्टन्स (१२००km) किलोमीटरच्या असल्यामुळे ते व्यक्ती येण्यासाठी पैशाच्या जुगाड करत होते. आणि पैशाच्या जुगाड करता करता तीन दिवस लोटून गेले त्या तीन दिवसांमध्ये आम्ही आसरा निवारा येथे रिक्वेस्ट करून त्यांच्या जेवणाची सोय केली. नंतर त्यांची एक बहिण  पुण्याला राहते असेच सांगून त्यांच्यासोबत आम्ही संपर्क केला. त्यानीं म्हटल की आमची आर्थिक परिस्थिती बिखट असल्यामुळे आम्ही तिथं येऊ शकणार नाही. असे सांगितल्यामुळे आमच्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांची जिम्मेदारी उचलून ट्रॅव्हल्सची संपर्क साधला आम्ही त्यांना हे सगळं सांगितल्यानंतर पर्पल ट्रॅव्हल्स शारुख दादा आम्हाला सहकार्य केलं (नि:शुल्क सेवा दिली). 


तो व्यक्ती पुण्याला आज सकाळी १०.०० ला पोचला तीतून त्यांचा नातेवाईकांनी त्यांचा निवास स्थानी जिल्हा - सातारा गाव-सुरली येथे आज ३.०० ला सुखरूप पोहचवले या कामांमध्ये आम्हाला पर्पल ट्रॅव्हल्सचे शारुख दादा सहकार्य केले. महानगरपालिका आसरा निवाराचे गोपाल गायधाने सहकार्य लाभलं. ट्रॅव्हल्स सोबत संपर्क करून देण्यात पप्पू भाऊ देशमुखचे सहकार्य लाभलं यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.


खूप परिश्रम घेतलेले आमचा मित्र परिवार सुशांत धकाते, विशाल रामगिरवार, विनोद पेंनलीवार, कार्तिक बल्लावार, सुरज बिट्टे पुढील सेवेस तत्पर जगूया थोडा माणुसकीसाठी एक हात मदतीचा. मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंत पनी मदती चा साथ द्या.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.