बल्लारपुर (का.प्र.) - महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार मा.बाळूभाऊ धानोरकर यांचे दि.३० मे २०२३ ला दिल्ली येथील वेदांत हाँस्पीटल मध्ये निधन झाले.त्यांच्या पार्थीवावर दि. ३१ मे २०२३ ला वरोरा येथे अंतीम संस्कार करण्यात आला.
त्या निमित्याने खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभावी त्याकरिता बल्लारपुर नगरपरिषद चौकात दि. ३१ में रोजी २०२३ ला महाराष्ट्र प्रदेश शहर व तालुका बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेस तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक सह सचिव चेतन गेडाम, जिल्हा महासचिव शंकर महाकाली, विधानसभा अध्यक्ष जुनैद सिद्दीकी,उपाध्यक्ष अजय रेड्डी,शहर अध्यक्ष अरविंद वर्मा, तालुका अध्यक्ष रूपेश भोयर,उपाध्यक्ष प्रांजल बालपांडे,विकास श्रीवास,ओबीसी समाज नेते विवेक खुटेमाटे,श्रीनिवास तोटा,संजु सुददाला,आफताब पठान,सोनल गुंडेवार,राहुल कांबले अमोल झामरे, राहुल रामटेके,मुरली व्यवहारे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.