घुग्घूस पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल .!
घुग्घूस (वि.प्र.) - शहरातील काँग्रेस पक्षाचे माजी शहर अध्यक्ष जावेद आलम सिद्दीकी यांने नौशाद शेख या पत्रकारास वारंवार बातम्या प्रकाशित करतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली असता पत्रकार नौशाद शेख यांनी घुग्घूस पोलीस स्टेशनला सिद्दीकी विरोधात तक्रार दाखल केली असता भादंवी 294,504,506 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धमकी अश्लील शिवीगाळ देण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
जावेद सिद्दीकी यांनी वर्धा नदीचे नकोडा - चिंचोली या रेतिघाटाचे कंत्राट घेतले व नदी पात्रात जेसीबी, पोकलँड मशीन व पाण्यातून वाळू बाहेर फेकणारी बोट हे अवैधरित्या घातल्याने या संदर्भातील बातमी नौशाद शेख यांनी छापली असता सदर रेतीघाटावर उप विभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकीत प्रशासनाने मोठी कारवाई करीत घाटातील बंदी असलेले वाहने जप्त केली व लाखो रुपयांचा दंड ठोठावला व याप्रकरणा नंतर जावेद सिद्दीकी
यांच्या भावाने शहरातील आठवडी बाजार व गुजरी बाजारातील कर वसूलीचा कंत्राट घेतला व नियमाप्रमाणे जास्त वसुली करण्यास सुरुवात केली.
याप्रकरणाची माहिती व्यापाऱ्यांनी नौशाद शेख यांना दिली असता त्यांनी नगरपरिषदेतुन कर वसुलीचे अधिकृत दरपत्रक घेतले व प्रकरणाची शहानिशा केली असता व्यापाऱ्यांची तक्रार रास्त असल्याची निरदर्शनास येताच त्यांनी यासंदर्भात बातमी प्रकाशित करून व्यापाऱ्यांची होणारी लूट शासना समोर आणण्याचा प्रयत्न केला.
सदर गोष्टीचा राग मनात धरून जावेद सिद्दीकी याने 06 जून रोजी सकाळच्या सुमारास पोलीस स्टेशन समोरील चौकात नौशाद शेख यांना आई - बहिणीची अश्लील शिवीगाळ करीत बोलेरो वाहनाखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली.