नागपुर (वि.प्र.) - डॉ.रमणिक एस. लेनगुरे, ग्रंथपाल, रेणुका कॉलेज, बेसा, नागपूर, येथे कार्यरत आहेत. ते प्रसिद्ध विचारवंत, उत्कृष्ठ समाजसेवक, संशोधक, करीअर व स्पर्धा परिक्षा कौन्सिलर , नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणारे ग्रंथपाल, वर्ड रेकॉर्ड होल्डर कवी, वाचन चळवळीचे पुरस्कर्ते, प्रेरणादायी मागदर्शक, हेल्थ कोच तसेच विश्व मानवाधिकार संस्थेचे आंतरराष्ट्रीय सदस्य आहेत. त्यांचे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परिक्षा, रोजगार व करीअर मार्गदर्शन संबंधित 2014 पासून खूप मोलाचे कार्य आहे. ग्रंथालयाच्या माध्यमाने अनेक नावीन्यपूर्ण समाजउपयोगी व मानवतावादी उपक्रम राबवित असल्यामुळे त्यांची अनेक वर्ड बुक ऑफ रेकार्ड मध्ये नोंद घेण्यात आली आहे. व त्यांचे विशेष म्हणजे कोरोना राष्ट्रीय आणीबाणी च्या काळात दि. 25 मार्च 2020 पासून रोज एक कविता या प्रमाणे मानवतेला प्रेरणा देत कोरोना या एकाच विषयावर 1080 पेक्षा जास्त कविता लिहिल्या आणि विविध ऑनलाईन माध्यमाव्दारे जनमानसापर्यंत पोहाचवीत कोरोना काळात लढण्यासाठी त्यांच्या आशा पल्लवीत केल्या. अश्या अतुलनीय सामाजिक व साहित्यिक कार्याची दखल घेत संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा जेष्ठ कवयित्री ललिताबाई गवांदे यांच्या शिफारशीनुसार आणि संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉं. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून डॉं. रमणिक एस. लेनगुरे यांची मराठी साहित्य मंडळाच्या नागपूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.