बल्लारपुर (का.प्र.) - शांतता समिती सदस्य मोहरम उत्सव कमिटी पदाधिकारी, मस्जिद मौलाना,अध्यक्ष व मस्जिद सदस्य यांची आगामी मोहरम उत्सव संबंधाने बुधवार दिनांक १२.०७.२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वा. पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे जातीय सलोखा बैठक आयोजित करण्यात आली.
सर्व मोहरम उत्सव कमिटी पदाधिकारी, मस्जिद मौलाना,अध्यक्ष व मस्जिद सदस्य तथा शांतता समिती सदस्य यांनी आपल्या सूचना व सुझाव बैठकीत दिले.
ही बैठक चंद्रपुर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक संतोषसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सखोल असे मार्गदर्शन राजपूत साहेबानी केले व आपन आगामी सण सर्व एकोप्याने साजरे करु अशी विनंती केली.
या बैठकित शांतता समिति सदस्य सय्यद रमज़ान अली, बंडू धोत्रे,ताजुद्दीन शेख,मौलाना तुफैल,शकील रिजवी, बाबूपेट आस्ताना सवारी कमिटी पदाधिकारी ग्रामीण भागातिल सवारी कमिटी चे पदाधिकारी सह अनेक मान्यवर या बैठकित हजर होते.