बल्लारपुर (का.प्र.) - भारतीय जनता पार्टीने लोकसभा 2024 निवडणूक चे चित्र समोर ठेवून संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नवीन यादी प्रसिद्ध केली असून त्यातून जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी मा.श्री हरीश शर्मा यांची निवड केली आहे. मा.श्री हरिश शर्मा बल्लारपूर येथील रहिवासी असून ते बल्लारपूर चे नगराध्यक्ष होते. यापूर्वीसुद्धा मा.श्री हरीश शर्मा जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदावर होते. त्यांच्या निवडीबद्दल बल्लारपूर शहरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हर्ष व्यक्त केले जात आहे.
जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी मा.श्री हरीश शर्मा यांची निवड ..!
byChandikaexpress
-
0