चंद्रपुर (वि.प्र.) - मोहरम उत्सव साजरा करण्यासाठी सवारी कमिटी आयोजक व पदाधिकारी, यांची दिनांक 17 जुलाई रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे अध्यक्षतेखली रामनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राजेश मुळे यांनी बैठक आयोजित केली. या बैठकीत उपस्थितांचे मार्गदर्शन करीत कायदा व सुव्यवस्था कायम ठेऊन उत्सव गुण्या गोविंदाने साजरे करण्याची मान्यवरांनी विनंती केली.
आगामी मोहरम उत्सव आनंदाने व शांततेने पार पाडू अशी ग्वाही उपस्थित आयोजकांनी दिली सायंकाळी ६.०० वा. पोलीस ठाणे रामनगर येथे हि बैठक आयोजित करण्यात आली. रामनगर हद्दीतील सर्व मोहरम उत्सव कमिटी आयोजक पदाधिकारी यांनी आपल्या सूचना व सुझाव बैठकीत दिले व आपण आगामी सण सर्व एकोप्याने साजरे करु अशी पोलिस निरीक्षक मुळे यांनी विनंती केली.या बैठकित सय्यद रमज़ान अली, वहिद शेख, नगिनाबाग सवारी कमिटी पदाधिकारी नितेश शेडमाके,किशोर येरमे,सह सुलतान हुसैन,रशीद खान,मोहिद्दिन हुसैन,योगेश निखोटे,शेख चाँद,बाळू कोतपल्लिवार,सुभान पठाण,अबदुल रब,कृष्णा कुकुडकार सह सवारी कमिटी चे पदाधिकारी व अनेक मान्यवर या बैठकित हजर होते.