बल्लारपुर (का.प्र.) - डॉ. रमणिक एस. लेनगुरे, ग्रंथपाल, रेणुका कॉलेज, बेसा, नागपूर, येथे कार्यरत आहेत. ते प्रसिद्ध विचारवंत, उत्कृष्ठ समाजसेवक, संशोधक, करीअर व स्पर्धा परिक्षा कॉन्सीलर, नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणारे ग्रंथपाल, वर्ड रिकॉर्ड होल्डर कवी, वाचन चळवळीचे पुरस्कर्त, प्रेरणादायी मागदर्शक, हेल्थ कोच, मराठी साहित्य मंडळाचे नागपूर शहर अध्यक्ष तसेच विश्व मानवाधिकार संस्थेचे आंतरराष्ट्रीय सदस्य आहेत.
ग्रंथालय आणि ग्रंथालयीन सेवा हेच आपले ध्येय मानीत ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रूजावी यासाठी ते नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात. जसे थॉट ऑफ द डे, हॉस्पीटल लायब्ररी, वृद्धाश्रम ग्रंथालय, हेल्थ लायब्ररी, पब्लिक लायब्ररी, घडो विद्यार्थी, ग्रंथालयातून स्पर्धा परीक्षेकडे, एक विचार आपले जीवन बदलू शकतो, व्हावे त्यांच्या समान या संपूर्ण कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात विविध आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारे ग्रंथपाल म्हणून त्यांची ओळख देखील आहे.
ते विद्यार्थ्यांना निरंतर रोजगार व नोकर भरती संदर्भात जाहीराती, शैक्षणिक संदर्भातील महत्वाची माहिती, स्पर्धा परीक्षा व करिअर विषयक जागरूकता, सकारात्मक विचार व्दारे विद्यार्थ्यांना सोशल नेटवर्कींग, विशेषतः फेसबुकच्या माध्यमातून 2014 पासून अविरतपणे सेवा देण्याचे कार्य आज पर्यंत करीत आहेत.
या विद्यार्थीभिमुख मानवतेच्या कार्याबद्दल भारत सरकार मान्यताप्राप्त, मिनीस्ट्री ऑफ एमएसएमई व आएसओ सर्टिफाईड इन्फ्युअएन्सर बुक ऑफ वर्ड रेकार्ड मध्ये नोंद घेवून त्यांना सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.