बल्लारपुर (का.प्र.) -डॉ .रमणिक एस. लेनगुरे, ग्रंथपाल, रेणुका कॉलेज, बेसा, नागपूर, येथे कार्यरत आहेत. ते प्रसिद्ध विचारवंत, उत्कृष्ठ समाजसेवक, संशोधक, करीअर व स्पर्धा परिक्षा कॉन्सीलर, नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणारे ग्रंथपाल, वर्ड रिकॉर्ड होल्डर कवी, वाचन चळवळीचे पुरस्कर्त, प्रेरणादायी मागदर्शक, हेल्थ कोच, मराठी साहित्य मंडळाचे नागपूर शहर अध्यक्ष तसेच विश्व मानवाधिकार संस्थेचे आंतरराष्ट्रीय सदस्य आहेत.
तितिक्षा इंटरनॅशनल संस्था, पुणे व्दारे आयोजित पहिले तितिक्षा राष्ट्रीय संमेलनात दि. 06 ऑगस्ट 2023 ”कोरोना संघर्षातील जीवनगाणे” या कोरोना काळातील मानवतेला प्रेरणा देणा-या कविता संग्रहास व्दितीय राष्ट्रीय पुरस्कार 2023 जाहीर झाला. त्यांच्या कोरोनाशी लढणा-या, झुंज देणा-या पृथ्वीवरील सर्व लेकरांस समर्पीत असलेल्या जे भाग्योदय पब्लिशिंग हाउस, जयसिंगपूर येथून प्रकाशित पहिल्याच कविता संग्रहास पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.