बल्लारपुर (का.प्र.) - आता नुकतीच यशवंतराव चव्हाण घरकुल योजना सुरू होत आहे आणि या घरकुल योजनेत डोमेसियल अट लादण्यात आली, ती अट रद्द करण्यात यावी यासाठी. निषाद पार्टी चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर राजुभाऊ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली निषाद पार्टी बल्लारपुर आणि चंद्रपुर चे शिष्ट मंडळ जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर येथे निवेदनात्मक मागणी करण्यात आली.
रमाई आवास योजनेत आणि शब्बरी आवास योजनेत हि अट का नाही? असा प्रशन जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत असतांनी करण्यात आला.एन.टी,प्रवर्ग हा आधिच अतिशय मागासलेला आणि अशिक्षीत समाज असुन यावर कागदी बोझा का?
आज देश स्वतंत्र होते 76 वर्ष होत आहे आणि समाज राजकीय आरक्षणा पासुन वंचित आहेत. या एन,टी प्रवर्गावर किती अन्याय कराल. हि डोमेसियल अट रद्द व्हावी या साठी निवेदन देण्यात आले. निवेदन देत असतांनी. बल्लारपुर विधानसभा महिला जिल्हा उपाध्यक्षा अल्का ताई भोयर, इंदिरा ताई शिकारदार, विदर्भ सचिव राजकुमार भाऊ निषाद ,चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष राजू भाऊ लांडगे, चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष रामभरोसे निषाद बल्लारपुर तालुका अध्यक्ष सुरेश केवट, उमेश निषाद बल्लारपुर, नारायण शिकारदार, चंद्रपुर महिला जिल्हा अध्यक्षा हेमलताताई पोईनकर, लिगलसेल महिला जिल्हा अध्यक्षा अॅड, कांचन ताई दाते.पार्वताताई पारशिवे, संगीता लांडगे,रमेश भोयर, महादेव भोयर,देवानंद भोयर, छत्रपती जुनघरे,अमोल जुनघरे, दौलत भोयर,वारलु ब्रामणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.