बल्लारपुर (का.प्र.) - श्री साईबाबा सेवा संस्था बल्लारपुर चे अध्यक्ष श्री पांडुरंग जरीले यांनी वाढदिवस च्या निमित्ताने सुभाष बहुरिया हे दोघेही पती पत्नी बेडवर पडलेले आहे. त्यांचे दोन्ही अपत्य विकलांग आहे. या पावसाळ्यात कुडाच्या झोपडी पडली व त्यांचे कुटुंबीय रस्तावर आले. कल्पना कोकस यांनी श्री जरीले यांना माहिती दिली. व पाहणी केली असता भयंकर खराब परिस्थिती दिसली. पी.यू. जरीले यांनी त्वरित घर बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. 15 दिवसात 15'×18' चे बांधकाम पूर्ण केले. व वाढदिवस च्या दिवशी उदघाटन केले व त्यांचे सुपूर्त केले. अन्न, वस्त्र व निवारा ह्या मुलभूत सुविधा आहे. श्री साईबाबा संस्था बालाजी वॉर्ड, बल्लारपुर यांच्या वतीने ह्या सुविधा पोहोचल्या जाते हा उपक्रम गेल्या 30 वर्षा पासुन अति दुर्गम भागात, जंगल भागातील खुप गरीब होतकरू लोकांपर्यंत जसे भामरागढ़, जीवथी, कोरपाना, पोमभूर्णा तालुक्यातील लोकांपर्यंत पोहचल्या जातात. तसेच बल्लारपुर तालुक्यातील लोकांपर्यंत विकलांग ना दर महिन्याला फळ धान्य सामुग्री पोहोचण्याचे उपक्रम चालू आहे. या वेळी श्री प्रा.एम. यू. बोंडे सर, सेवा निवृत्त प्राचार्य अनिल वागदरकर सर, प्राचार्य राजेंद्र खाडे सर, वसंतराव खेडेकर जेष्ठ पत्रकार, गजेंद्र आर्य पत्रकार, माजी मुख्याध्यापक मादेकर सर, विनायक साळवे सर, दामोदर उरकुडे साहेब, राजेश खेडेकर पत्रकार, शंकर पुलगमवार, भास्कर शेळके, गणपत राखुंडे, प्रकाश झाडे, कल्पना कोकस व गणेश रहिकवार (फिल्म निर्माता - दिग्दर्शक), साईल रहिकवार, तानाजी वैद्य, साई पिल्ले, सचिन खोके आदींची उपस्थिती होती.
श्री पांडुरंग जरीले यांच्या वाढदिवस निमित्ताने विकलांग यांना घरकूल भेट .!
byChandikaexpress
-
0