बल्लारपुर (का.प्र.) - बल्लारपूर -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हाउपाध्यक्ष श्री.विष्णूभाऊ बुजोने यांची बल्लारपूर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी संजोग घ.मेंडे यांचा कडे नवीन पूल वस्ती व डेपो साईबाबा वार्ड या मार्ग देण्यात यावी अशी मागणी निवेदन मार्फत करण्यात आली.
बल्लारपूरात सतत पाणी पूर आल्यास वस्ती व टेकडीला विभागाला जोडणारा मार्ग गोल पुलिया पाण्याने जमा होऊन बंद होत असतो. त्यामुळे लोकांना खूप समस्या निर्माण होत असते. व त्याच दृष्टीने बल्लारपूर मनसे जिल्हाउपाध्यक्ष विष्णूभाऊ बुजोने यांची बल्लारपूर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी संजोक घ मुंडे यांचा कडे निवेदन देतांना उपस्थित उमेश कुंडले बल्लारपूर शहर प्रमुख मनसे तसेच मनविसे केतन तगरम जिल्हाउपाध्यक्ष योगेश गोरडवार सर्व मनसैनिक उपस्थित होते.