विदर्भ लहुजी सेनेचे युवा अध्यक्ष आकाश भाऊ खडसे यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन.!
अमरावती (वि.प्र.) - लोकशाहीर साहित्य सम्राट कवी, लेखक डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त चवरे नगर येथून भव्य दिव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली असून ती शहरातील विविध ठिकाणाहून म्हणजेच शंकर नगर, कंवर नगर, दर्गा प्लाॅट, राजापेठ ते राजकमल चौक येथे या रॅली चा समारोप करण्यात आला. तसेच विदर्भ लहुजी सेनेचे आघाडी जिल्हा अध्यक्ष आकाश भाऊ खडसे यांच्या नेतृत्वात ही भव्य दिव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली. व लोकशाहीर साहित्य सम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.