नालंदा क्रिडा मंडळ कराटे क्लब च्या विद्यार्थ्यांनी मिळवला विजयी.!

इंटरनॅशनल कराटे टूर्नामेंट मध्ये बल्लारपुर शहरातील नालंदा क्रिडा मंडळ कराटे क्लब च्या विद्यार्थ्यांनी मिळवला विजयी.!

बल्लारपूर (का.प्र.) - नुकत्याच घेण्यात आलेल्या कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथे आयोजित करण्यात आलेल्या 4 थ्या इंटरनॅशनल कराटे टूर्नामेंट मध्ये बल्लारपूरच्या नालंदा क्रीडा मंडळ कराटे क्लब विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून तालुक्याचे नाव उज्ज्वल केले.
कर्नाटक शिवमोगा येथे 4 थी इंटरनॅशनल कराटे टूर्नामेंट दी. 5 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात आली असून या इंटरनॅशनल कराटे टूर्नामेंट मध्ये एकूण 14 देश 1) यू एस ए, 2) नेपाल, 3) भूटान 4) श्रील्ंका, 5) बान्ग्लादेश, 6)दुबई, 7) इंडोनेशिया, 8) केनेडा, 9) रशिया, 10) थाईलैंड, 11) चायना, 12) कोरिया 13) जापान 14) अपगानिस्थान सहभागी झाले होते.
त्यामध्ये महाराष्ट्र मधून चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तालुका मधील नालंदा क्रीडा मंडळ कराटे क्लब बल्लारपुरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या कराटे टूर्नामेंट मध्ये 1) साईप्रणित स्वामी डोड्डीपेल्लीवार याने वयोगट 16 वर्ष खालील काता व कुमिते मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले त्याचप्रमाणे 2) यश भैय्यालाल कोरे यांनी सुद्धा काता मध्ये सिल्वर मेडल व कुमिते मध्ये ब्रांन्स मेडल प्राप्त केले असून हा विद्यार्थी दिलासाग्राम स्कूल बल्लारपूर चा आहे व त्याच प्रमाणे 3) भास्कर संजय घुगलोत वयोगट 16 वर्षा खालील काता मध्ये ब्रांन्स मेडल व कुमिते मध्ये सिल्वर मेडल प्राप्त कले असुन त्याच प्रमाणे यांचे कराटे प्रशिक्षक 4) सुनिल विजय कांबळे यांनी सुधा वयोगट 40 वर्षांमध्ये काता मध्ये सिल्वर मेडल प्राप्त करून बल्लारपूर तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे व यश प्राप्त केलेल्या खेळाडूंनी या यशाचे श्रेय दिलासाग्राम स्कूलचे प्रिन्सिपल सिस्टर विनया व व्हाईस प्रिन्सिपल सिस्टर फुलकुमारी त्या प्रमाने नालंदा क्रीडा मंडळ व शहरी विकास केंद्र बल्लारपूर उपक्रम संस्कार व्यायाम शाळेचे अध्यक्ष समीर भाऊ केने व उपाध्यक्ष मनीष भाऊ पांडे व विध्यार्थी चे आई वडील व कराटे प्रशिक्षक सुनील विजय कांबळे आकाश भाऊ दुर्गे व सांस्कृतिक विचार मंच यांना दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.