देशी बनावटीचे अग्नीशस्त्र व 1 जिवंत काळतुस सह आरोपी ताब्यात.!

गणेश उत्सवाचे पुर्वसंध्येला देशी बनावटीचे अग्नीशस्त्र व 1 जिवंत काळतुस सह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरचे ताब्यात.!

बल्लारपुर (का.प्र.) - गणेश उत्सवाचे पुर्वसंध्येला समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मा.पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांनी अवैद्धरीत्या शस्त्र व अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारा विरुध्द कारवाई करण्याचे दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी पो.उप नि.अतुल कावळे यांचे पथक तयार करुन दि. 18/09/2023 रोजी पो.स्टेशन राजुरा हद्दीत एक इसम अवैद्धरीत्या अग्नीशस्त्र त्याचे कमरेला बाळगुन राजुरा बस स्टॉप जवळ फिरत आहे.
अश्या खबरेवरुन कारवाई करत. आरोपी नामे राजरतन राहुल वनकर वय 18 वर्षे रा.विहीरगाव ता.राजुरा जि.चंद्रपुर याला ताब्यात घेवुन त्याचे कडुन एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र किंमत 10,000/- रू व 1 जिवंत काळतुस किंमत 1000/- रू. व रियलमि कंपनीचा मोबाईल किंमत 10,000 /- रू. असा असा एकूण 21,000 /- रू. मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आले.
आरोपी नामे राजरतन राहुल वनकर वय 18 वर्षे रा.विहीरगाव ता.राजुरा जि.चंद्रपुर विरुध्द पो.स्टेशन राजुरा येथे कलम 3, 2 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो.स्टेशन राजुरा करित आहेत.
सदरची यशस्वी कामगीरी मा.पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा.अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि.महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस उप निरीक्षक अतुल विनायक कावळे, पो.ना.अनुप डांगे, जमिर पठाण, नितेश महात्मे, मिलींद चव्हान, पो.शि.प्रसाद धुळगंडे, चा.ना.पो. दिनेश ऊराडे सर्व स्था.गु.शा. चंद्रपुर यांनी केली.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.