श्री चंद्रशेखर जाधव आणि रवि बारापात्रे यांची बिनविरोध निवड.!

आशिया कॉम्बट फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी भारत व्यायाम शाळा चिटणीस पार्क चे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर जाधव सर, तर महासचिव पदी रवि बारापात्रे यांची बिनविरोध निवड.!

नागपूर (वि.प्र.) - सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर येथे संपन्न झालेल्या कॉम्बट फेडरेशन ऑफ आशिया व कॉम्बट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या वार्षिक सभेमध्ये नागपूरचे सुपुत्र, महापौर केसरी श्री चंद्रशेखर जाधव यांची आशियाई कॉम्बट फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी तर रवि बारापात्रे यांची आशिया सेक्रेटरी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. 9 व 10 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या मीटिंग मध्ये ऑल इंडिया कॉम्बट फेडरेशनचे 27 राज्याचे प्रमुख उपस्थित होते.कॉम्बट खेळ हा कुस्ती प्रकारामध्ये असून आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा खेळ खेळला जातो.भारतामध्ये या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या मीटिंगमध्ये वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या असून या समित्यामार्फत येणाऱ्या काळात स्पर्धाचे नियोजन करण्यात येणार आहे. या मीटिंगसाठी ऑल इंडिया कॉम्बट फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी संजय राय (उत्तर प्रदेश) मुख्य प्रायोजक क्रीडा महर्षी हेमंत डोणगावकर (नागपूर) श्यामसुंदर मोहोपात्रा तांत्रिक समिती प्रमुख (ओडिसा) श्रीमती दिपाली नंदी, भानुप्रतापसिंग धोनवा, हिम्मत ढेंगळे,धनंजय धेंडे असे राज्य व राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते तर भूतान. बांगलादेश. नेपाळ, मॉरिशस, श्रीलंका, म्यानमार या देशातील प्रतिनिधी ऑनलाइनच्या माध्यमातून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंमत ढेंगळे यांनी केले तर आभार जयवंत बोभाटे यांनी मानले.चंद्रशेखर जाधव यांची कॉम्बट फेडरेशन ऑफ आशियाच्या उपाध्यक्षपदी तर आशिया सेक्रेटरी म्हणून रवि बारापात्रे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आशिष मेरखेड, राजू क्षीरसागर, भारत व्यायाम शाळा चे पदाधिकारी आदी मान्यवरांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.