राष्ट्र निर्माण कार्यात शिक्षकांचे अत्यूच्च योगदान - डॉ.ज्ञानेश हटवार
बल्लारपुर (का.प्र.) - ५ सप्टेंबर ला शिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हल क्लब ऑफ भद्रावती तर्फे शिक्षण क्षेत्रातील प्रज्ञावंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ ज्ञानेश हटवार व सौ मेघा शेंडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ वर्षा धानोरकर प्राचार्य, फेरीलँड विद्यालय भद्रावती, प्रमुख अतिथी सौ मेघा शेंडे, डॉ. ज्ञानेश हटवार, स्वाती चारी, सुनीता खंडाळकर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न,भारताचे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून करण्यात आली.
याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौ मेघा शेंडे व प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांनी "राष्ट्र निर्माण कार्यात व मानवी जीवनात व्यक्तिमत्व विकासात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले". सौ. मेघा शेंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यामुळेच महिलावर्ग शिक्षित झाला व प्रगती पथावर गेला असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मार्गदर्शनात सौ वर्षा धानोरकर यांनी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवित कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय इनरवर क्लबच्या सचिव प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रश्मी बीसेन यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ केशनी हटवार यांनी केले. कार्यक्रमाला इनरव्हल क्लबच्या जयश्री कामडी, विश्रांती उराडे, कविता सुफी तसेच इतर सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.