बल्लारपुर (का.प्र.) - युवा ग्रामीण पत्रकार संघाचा जिल्हा उपाध्यक्षपदि राहुल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी राहुल गायकवाड यांना नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली आहे.
युवा ग्रामीण पत्रकार संघ हा सर्वाधिक सभासद असलेला पत्रकार संघ आहे. पत्रकाराचा न्याय व हक्कासाठी, समाजिक प्रगती करिता सदैव कटीबद्ध असलेला संघ म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाने आपली ओळख निर्माण केली आहे.
राहुल गायकवाड यांच्या नियुक्ती चे स्वागत प्रशांत वैरागडे, अलोक साळवे, शितल बेताल, सुरेश रंगारी, रामू मेदरवार आणि गणेश रहिकवार (चंडिका एक्सप्रेस - संपादक) यांनी केले आहे.