नागपुर (वि.प्र.) - 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून यश हॉस्पीटल आणि फॅन्स क्लबच्या वतीने भव्य अश्या सदभावना यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या सदभावना यात्रेचा प्रारंभ दिघोरी उडान पुल चौक पासून सुरूवात होवून ज्योती उच्च प्राथमिक शाळा, गाडगेबाबा चौक, गणेश मुर्ती चौक, चिटणिस नगर बगीचा, पंचवटी वृद्धाश्रम या हा मार्ग होता. सदभावना यात्रेचा शेवटी येस हॉस्पिटल, दिघोरी उड्डान पुल चौक येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या सदभावना यात्रेचे आयोजन डॉं. प्रकाश ढगे यांनी केले. या सदभावना यात्रेमध्ये गांधीजीच्या वेशभुषेत श्री मारोती ढोबळे, डेबुजी मेश्राम हे होते तर या यात्रेमध्ये प्रा. डॉ. रमणिक लेनगुरे वर्ड रेकॉर्ड होल्डर, सामाजीक कार्यकर्ते, थोर विचारवंत यांनी उपस्थिती दर्शविली तसेच परिसरातील बहुसंख्य नागरिक व बाळगोपाळ यांनी उपस्थिती दर्शविली.