दिवाळीत ऑनलाईन शॉपींग करतांना सावधानता बाळगावी - एड. चैतन्य भंडारी

धुळे (जगदीश काशिकर) : दिवाळीच्या सणासुदीच्या काळात बहुतांशी नागरीक हे ॲमेझॉन, मिंत्रा व फ्लिपकार्ट तसेच इतर अनेक ऑनलाईन शॉपिंग साईट वरुन अॅप्लीकेशनच्या माध्यमातून मोबाईलवर ऑनलाईन खरेदी मोठया प्रमाणावर करत आहेत. सध्या दिवाळीच्या काळात हॅकर्स लोक या वेबसाईटच्या नावाने डुप्लीकेट वेबसाईट बनवून त्या माध्यमातून अनेक जास्तीत जास्त ऑफर देवून नागरिकांना आपल्या जाळयात ओढून ऑनलाईन खरेदी करण्याची जाहिरात करतात, त्या ऑफरला नागरीक बळी पडून व कुठलीही वस्तू खरेदी करण्या अगोदर ती वेबसाईट खरी आहे की खोटी यांची खात्री करुनच ऑनलाईन शॉपिंग करावी अन्यथा कांची मोठया प्रमाणात फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सदर ऑनलाईन शॉपिंग करतांना त्या ऑनलाईन वेबसाईटचे नाव आपण ऐकले नसाल आणि त्या वेबसाईटवरुन ऑनलाईन शॉपिंग करीत असाल तर आपण ऑनलाईन शॉपिंग करु नये, कारण या बनावट वेबसाईट आपण ज्या वस्तू मागविल्या त्या वस्तु न पाठविता खराब माल किंवा इतर खराब वस्तू पाठवून आपली फसवणुक करु शकतात. अशा वेबसाईटवर आपला एटीएम कार्डाचा १६ अंकी नंबर व बँके संदर्भातील माहिती कोणालाही शेअर करु नका, जर आपल्याला मिंत्रा किंवा ॲमेझॉनच्या किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन साईटचा नावाने एक मॅसेज येतो की, अभिनंदन आपल्याला ५० टक्के डिसकाउंट देण्यात आलेला आहे प्राप्त करण्यासाठी आपण खालील लिंकवर क्लिक करुन डिसकाउंटचा आनंद घ्यावा तसेच फेसबुक, इन्स्टाग्रामवर ऑनलाईन शॉपिंगच्या बनावट जाहिरातींना ही बळी पडू नये तसेच याच्यासारख्या अनेक मॅसेजला आपण बळी पडू नये व आपली बँकींग संदर्भातली कोणतीही माहिती शेअर करु नये तसेच आपली फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा सायबर तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.