कोजागिरी निमित्त गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचे सत्कार.!


बल्लारपुर (का.प्र.) : श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपुर बामणी द्वारे कोजागिरी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचे सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात श्री बापूराव वैद्य यांनी लिहिलेल्या (संस्कृती) पुस्तकाचे प्रकाशन ग्रामगीताचार्य श्री बंडोपंत बोडेकर यांनी केले. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय naitingel पुरस्कार 2023 पुष्पा ताई श्रावण पोडे (पाच भाई) यांचा एड. शैला ताई दादाजी वांढरे (चाफले) यांची महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग सदस्या निवड झाल्याबद्दल दोघांचे सत्कार करण्यात आले. तसेच डॉ.नीलेश पावडे सामाजिक कार्यकर्ते ता.पोंभूर्णा, संजय वागदरकर मुख्याध्यापक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल वाडा, श्री गजानन घुघुल कार्यकारी सदस्य, किसन राव पोडे सदस्य, पुरुषोत्तम पोटे सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री पांडुरंग जरीले यांनी भूषविले. या कार्यक्रमात 10 वी 12 वी, पदवीधर, पदव्युत्तर, पीएच डि., विविध कार्यक्रम जसे नृत्य स्पर्धा (मुला मुलींचे व महिलाचे) घेऊन बक्षिस व सप्रेम भेट देण्यात आली व सत्कार करण्यात आला. पुष्पा ताई पोडे एड. शैला ताई वांढरे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोडेकर, मनोज ठेंगणे, डॉ.नीलेश पावडे, श्री संजय वागदरकर यांनी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र खाडे मंडळ चे सचिव, संचालन नितीन वरारकर, आभार प्रदर्शन सौ.वंदना पोटे अध्यक्ष महिला आघाडी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष पी.यू. जरीले उपाध्यक्ष प्रा.एम. बोंडे सर, सचिव प्रा.आर. एन. खाडे सर, कोषाध्यक्ष विनायक साळवे सर, सहसचिव श्रीमती कमलताई वडस्कर सदस्य, मनोहर माढेकर, युवा आघाडी चे अध्यक्ष विवेक खुटेमाटे, उपाध्यक्ष कुणाल कौरासे, सचिव अतुल बांदुरकर, नितीन वरारकर, केशव ठीपे, सतीश घुघुल, प्रा.रवी साळवे, बालाजी भोंगले, शंकर काळे, संजय उरकुडे, तानाजी वैद्य, गुरू नाथ वैद्य, कविता ताई वैद्य (सरपंच नांदगाव पोडे), महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.वंदना पोटे, उपाध्यक्ष सौ. किरण बोबडे, सुवर्णा कस्ती, अचल काकडे, सिंधुताई पोटे, निधी मांडवकर, इंदू राजूरकर, सुनीता लोह, प्रा. युवराज बोबडे सर, भास्कर वडसकर इत्यादीनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.