बल्लारपुर (का.प्र.) : ११ नोव्हेंबर मौलाना अबुल कलाम आझाद जयंती(राष्ट्रीय शिक्षण दिन) निमित्त चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग शहर अध्यक्ष मतीन कुरेशी च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे दोन ही प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमजान अली, प्रा. बलबिरसिंह गूरोन यांच्या मार्गदर्शनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालातील जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
सर्वप्रथम मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला सामान्य रुग्णालय चंद्रपूर चे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर सोनारकर साहेब यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तदनंतर अल्पसंख्यांक विभाग चे सर्व पदाधिकारी व काँग्रेस प्रेमी यांनी सुद्धा विनम्र अभिवादन केले.
मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षण मंत्री होते,त्यांची आपल्या या देशावर असीम श्रद्धा होती.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात हि त्यांची भूमिका अती महत्त्वाची होती.प्रत्येक घरापर्यंत शिक्षण चे प्रचार प्रसार झालेच पाहिजे.शिक्षणाशिवाय प्रगती होणार नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते.सर्वधर्म समभाव ची त्यांची ही विचारसरणी कौतुकास्पद होती असे मत या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमजान अली यांनी व्यक्त करीत मौलाना आझाद यांना आदरांजली वाहत विनम्र अभिवादन केले.मौलाना अबुल कलाम आझाद चे आदर्श समोर ठेऊन सामाजिक जागृती करण्याची अत्यंत गरज आहे असे मत चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे अध्यक्ष मतीन कुरेशी यांनी व्यक्त केले.
सामान्य रुग्णालयातील अनेक वॉर्डातील रुग्णांना दिनांक 11/11/2023 रोजी दुपारी 2 वाजता फळ वाटप करून.हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.फळ वाटप च्या या कार्यक्रमात काँग्रेस कमटीच्या महिला जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे प्रदेश सचिव स्वप्नील शेंडे, अल्पसंख्यांक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष बापू अन्सारी,काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग चे जिल्हा महासचिव सुबेस्तियन जॉन,काँग्रेस इंटक चे जिल्हाध्यक्ष विजय धोबे, युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव कादर शेख,काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग चे शहर उपाध्यक्ष अर्जूनसिंह कंडा, साजिद मिर्झा, अल्पसंख्यांक काँग्रेस चे शहर महासचिव एजाज भाई,काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग चे शहर उपाध्यक्ष बबलू भाई,जमील शेख, सय्यद आसिफ,महिला काँग्रेस च्या शीतल कातकर,लता बारापात्रे,राजू काळे, विकास कोडापे सह काँग्रेस पदाधिकारी व अनेक काँग्रेस प्रेमी मान्यवरांची उपस्थिती होती.हे मात्र विशेष.