"दीपस्तंभ दीपोत्सव २०२३" दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न..!

बल्लारपुर (का.प्र.) : शैक्षणिक "दीपस्तंभ दीपोत्सव 2023" या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. सतत दर्जेदार अंकाची निर्मिती व प्रकाशन करणाऱ्या अक्षरधन पब्लिकेशन च्या वतीने ६ नोव्हेंबर २०२३ ला दीपोत्सव २०२३ या दर्जेदार राज्यस्तरीय दिवाळी अंकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. 
यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना मुख्य संपादक सुदाम साळुंखे यांनी "वाचन संस्कृती विकसित व्हावी व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नवनिर्मितीची ऊर्जा मिळावी यासाठी आम्ही सतत मागील दहा वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहोत. त्यातीलच हा एक उपक्रम असल्याचे नमूद केले."
प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष मुख्य संपादक सुदाम साळुंखे, प्रमुख अतिथी प्रा. विजय लोंढे साहित्यिक पुणे, प्रकाशक सौ. प्रतिभाताई साळुंखे, नवनाथ सुर्यवंशी, डॉ बाळासाहेब सिंगोटे सर, संपादक मंडळ व संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक साहित्यिक प्रामुख्याने उपस्थित होते.
या दिपोत्सव दिवाळी विशेषांकत लेख विभाग, महिला जगत, बाल नगरी, चित्र अशा विविध विषयांवर सर्वांग पूर्ण दर्जेदार व निवडक साहित्य संपादक मंडळांनी यात समाविष्ट केले आहे. हा दिवाळी अंक आपल्या अभिव्यक्तीचा ऊत्तम नमुना आहे. 
या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात प्रा. विजय लोंढे पुणे येथील साहित्यिक यांनी मार्गदर्शन केले. डॉ ज्ञानेश हटवार भद्रावती यांनी "दिपोत्सव दिवाळी विशेषांक २०२३ हा शिक्षक व विद्यार्थ्यांना साहित्य निर्मिती करण्यासाठी प्रेरणादायी आहे, हा उपक्रम नवोदित साहित्यिक मंडळी साठी एक अभूतपूर्व पर्वणी आहे, असे मनोगत व्यक्त केले.
शैक्षणिक दीपस्तंभ परिवाराने राज्यभरातील शिक्षक विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ देण्याचे व्रत गेल्या अनेक वर्षापासून हाती घेतले आहे. आजपर्यंत त्यांनी १९ राज्यस्तरीय दर्जदार अंक प्रकाशित केले आहेत. या दीपोत्सव २०२३ या अंकामध्ये १२१ साहित्यिक, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना समाविष्ट केले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील डॉ ज्ञानेश हटवार, सौ केशनी हटवार, सौ उज्ज्वला वानखेडे व शर्विल हटवार, गावंडे मॅडम यांचे साहित्य प्रकाशित झाले आहेत.
या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ बाळासाहेब सिंगोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपाली गोजवडकर यांनी केले. हा दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यासाठी मुख्य संपादक सुदाम साळुंखे सौ. प्रतिभाताई साळुंखे, नवनाथ सुर्यवंशी व संपूर्ण संपादक मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले. या प्रकाशन सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यप्रेमी शिक्षक, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.