श्री साई महिला भजन मंडळ यांना पुरस्कार .!
बल्लारपुर (का.प्र.) : श्री दत्त जयंती च्या निमित्ताने दि.20 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2023 पर्यंत दत्त जयंती साजरी करण्यात आली. त्यात गुरू चरित्र पारायण, सामुहिक हरिपाठ (भारुड) घट स्थापना, ह.भ.प.सद्गुरू काशिनाथ कोंडेकर महाराज यांचे हस्ते, तसेच श्री दत्तात्रय महाराज (दत्त गुरू) यांची भव्य शोभा यात्रा शहरातून मिरवणूक काढण्यात आली. शोभा यात्रेत श्री गुरुदेव सेवा महिला भजन मंडळ डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, श्री गुरुदेव सेवा महिला भजन मंडळ महाराणा प्रताप वर्ड, जय माता दि महिला भजन मंडळ महाराणा प्रताप वर्ड, श्री साई महिला भजन मंडळ बालाजी वॉर्ड, जगन्नाथ बाबा महिला भजन मंडळ डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, महालक्ष्मी महिला भजन मंडळ फुल सिंग वॉर्ड, ओम श्री दुर्गा महिला भजन विवेकानंद वॉर्ड, श्री सद्गुरू काशिनाथ महाराज कोंडेकार भजन मंडळ चंदन वाहि,सद्गुरू भजन मंडळ पाचगाव, सद्गुरू भजन मंडळ भेंडाला,आदर्श महिला भजन मंडळ दत्त मंदिर महाराणा प्रताप वर्ड बल्लारपूर यांनी तसेच शहरातील लोकांनी सहभाग घेऊन भव्य शोभा यात्रा मिरवणुक काढण्यात आली. विविध भजन मंडळ चे भजन स्पर्धा घेण्यात आली. त्यात श्री साई बाबा मंदिर चे अध्यक्ष पांडुरंग जरीले यांच्या श्री साई महिला भजन मंडळ चा पहिला पुरस्कार प्राप्त झाला. द्वितीय समित्रा भजन मंडळ तर तृतीय ओम दुर्गा भजन मंडळ यांना पुरस्कार प्राप्त झाला. श्री साई महिला भजन मंडळ च्या सौ संध्या मिश्रा, सौ शिला आसुतकर, सौ.सुमन ठाकरे, सौ विमल अंद्रस्कर, सौ. कुंदा राखुंडे, सौ माला बेले, सौ इंदिरा खानोरकर, इत्यादी नि भाग घेतला. व उत्कृष्ट गायन केले. दत्त मंदिर कडून प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात आली. दत्त मंदिर चे अध्यक्ष श्री अशोक जी गुप्ता, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, सचिव मारोतराव मोंढे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, गणपत राखुंडे, वॉर्डातील सर्व लोकांनी तसेच दत्त भक्तांनी अथक परिश्रम घेतले. व महाप्रसाद चा शेकडो लोकांनी आनंद घेऊन सांगता करण्यात आली.