राहुल गांधी कडून क्षत्रीय राजघराण्याचा अपमान .!
मुंबई (जगदीश काशिकर) : नागपुरात काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस पार पडला. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संबोधित केलं. यावेळी “राजा, महाराजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली नव्हती. त्यांनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी केली होती,” असं विधान राहुल गांधींनी केलं. यावरून सेंगर राजघराण्याचे वंशज अजय सिंह सेंगर यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
यावर बोलताना "सेंगर जालौन " राजघराण्याचे वंशज अजय सिंह सेंगर म्हणाले, “1812 मध्ये जेव्हा सेंगरांनी ब्रिटीश कारवायांचा विरोध केला तेव्हा कर्नल मार्टिनडेल त्यांना थोपवण्यासाठी शिपायांच्या तुकडीसह आले.सेंगरांनी ग्रेट डेक्कन रोडवर कूच करणार्या शिपायांवर हल्ला केला आणि अनेक मारले गेले. त्यानंतर सेंगरांनी शौर्य गाजविले. योद्धा म्हणून सेंगरांची ख्याती लोदी युगात उद्भवली, जेव्हा त्यांनी दिल्ली सल्तनती विरूद्ध त्यांच्या प्रदेशांचे रक्षण केले आणि बाबरशी युद्ध केले.एकोणिसाव्या शतकात लखनेसर आणि बलिया या भागात त्यांचे जमिनीचे हक्क आणि प्रादेशिक राजवट कायम ठेवत त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला. पुढे सेंगर म्हणतात की हिन्दूस्थानातिल अनेक 567 क्षत्रिय राजघराण्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. पण, राहुल गांधींनी सांगितलं, ‘देशातील राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली होती.’ अशाप्रकारे क्षत्रिय राजघराण्यांचा अपमान करणं अतिशय चुकीचं व देशद्रोही वक्तव्य आहे. मला वाटतं हे महाराष्ट्र आणि देशात कुणी सहन करणार नाही,देशातील राजांनी भारत देश स्वतंत्र झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता भारत देशात सामील झाले, आपली हजारो एकर भूमी, किल्ले, राजवाडे या देशात समर्पित केले. या देशाकरिता प्राणाचे बलिदान व त्याग समर्पित करणाऱ्या क्षत्रीय राजा महाराजांच्या अपमान करणे योग्य नाही. क्षत्रिय राजघराणे भारतात सामील झाले तेव्हा कुठे या देशाच्या नकाशा - सीमा या प्रचंड मोठ्या दिसतात. राहुल गांधी यांनी या प्रकरणी माफी मागावी अन्यथा त्यांना देशात फिरू दिला जाणार नाही असे सेंगर म्हणतात.
"कामगारांच्या आनंदात आमचा आनंद" - गजानन राणे
मुंबई : मास्टर पॉलिश प्रा.ली. या कंपनीत गेल्या 15 ते 20 वर्षापासून काम करत असलेल्या कामगारांना व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता अचानक कामावरून कमी केले. सदरील कामगारांनी व्यवस्थापनाकडे गेल्या 15 ते 20 वर्षाचा कायदेशीर हिशोब मागितला असता तुम्ही कुठेही जा तुम्हाला काहीही मिळणार नाही अशी धमकी दिली.
कामगारांना आपल्यावर आलेले संकट फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडवू शकते हे लक्षात आल्यावर सर्व कामगारांनी मनसे अध्यक्ष आदरणीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कामगार सेनेचे सरचिटणीस श्री. गजानन राणे यांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली. कामगारांच्या समस्या समजावून घेवून श्री. गजानन राणे यांनी तत्काळ पदाधिकाऱ्यांना संबंधित कंपनीशी संपर्क करायला सांगितला.
सदरील कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क झाल्यावर मनसे स्टाईल ने व्यवस्थापनाला कामगारांची गेल्या 15 ते 20 वर्षाची कायदेशीर देणी 8 दिवसाच्या आत देण्यास सांगितले. व्यवस्थापनाने मागणी मान्य करून सर्व कामगारांना योग्य ती कायदेशीर देणी दिली. सर्व कामगारांनी आदरणीय राज ठाकरे कामगार नेते श्री. गजानन राणे व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे आभार मानले.
अयोध्येत दारूबंदीची केलेली मागणी मान्य करणार्या योगी सरकारचे अभिनंदन !
अयोध्येप्रमाणेच काशी-मथुरेसह अन्य सर्वच तीर्थक्षेत्री मद्य-मांस बंदी करा ! - हिंदु जनजागृती समिती
येत्या 22 जानेवारी 2024 अयोध्येत होणार्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मद्य-मांस यांवर 100 टक्के बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगीजी यांच्याकडे केली होती. यासाठी अनेक ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनेही केली. याची तत्परतेने दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथजी यांनी अयोध्येच्या 84 कोसी परिक्रमा यात्रेच्या क्षेत्रात दारूवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. या स्तुत्य निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते आणि उत्तर प्रदेश सरकारचे आभारही व्यक्त करते.
याचप्रमाणे सर्व धार्मिक क्षेत्रांचे पावित्र्य जपण्यासाठी अयोध्येप्रमाणे काशी, मथुरा आणि अन्य सर्व तीर्थक्षेत्रांच्या परिसरात मद्य-मांस यांवर 100 टक्के बंदी आणण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मा. योगीजी यांच्याकडे केली आहे.
आज देशातील अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे आदी ठिकाणी लाखो भाविक भेटी देतात. याठिकाणी ‘पर्यटनवृद्धी’च्या नावाखाली बिअरबार, डान्सबार, लिकर शॉप, चायनीज खाद्यपदार्थांची दुकाने, मसाज सेंटर, मटन शॉप मोठ्या प्रमाणावर उघडली जातात. प्रत्यक्षात येणारे भाविक हे देवदर्शन, तीर्थयात्रा, साधना करण्यासाठी अशा ठिकाणी येत असतात. ‘मद्य-मांस’ किंवा चंगळ करण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे भाविकांसाठी सोयी-सुविधा अवश्य निर्माण कराव्यात; मात्र अशा पवित्र स्थानांचे पावित्र्यही जपायला हवे. काही तीर्थक्षेत्री गेल्यावर तेथील पावित्र्य जपले न गेल्याने खरेच आपण तीर्थक्षेत्री आलो आहोत का ? अशी शंका निर्माण होते; म्हणून यापूर्वी हरिद्वार आणि ऋषीकेश येथेही स्थानिक प्रशासानाने मद्य-मांस यांवर 100 टक्के बंदी आणली. ‘हरिद्वार आणि ऋषीकेश या तीर्थक्षेत्री कुंभमेळे होतात. त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक तेथे धार्मिक उपासना करण्यासाठी येतात. या कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक भावना तीर्थक्षेत्राशी जोडलेल्या आहेत. त्याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे’, असे म्हणत ही बंदी मा. सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. याच धर्तीवर सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य-मांस यांवर 100 टक्के बंदी आणावी, अशी समितीची मागणी आहे.