'स्प्राऊट्स' या ईग्लिश वृत्तपत्रा वर १०० कोटी रुपयांचा दावा.!
मुंबई (जगदीश काशिकर) : भारतातील केंद्र सरकारच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'यशॊभूमी'चे उपकंत्राट हे 'Foodlink F&B Holdings या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिळालेले आहे. हे उपकंत्राट कोट्यवधी रुपयांचे आहे. या कंपनीने मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे केलेले आहेत. इतकेच नव्हे तर सरकारचा कोट्यवधी रुपयांचा टॅक्सही बुडवलेला आहे, अशी खळबळजनक माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (SIT) मिळालेली आहे.
याप्रकरणातील मुख्य आरोपी व कंपनीचा संचालक संजय मनोहर वझिरानी याचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. तपासादरम्यान त्याने ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम ही 'हवाला'मार्फत पाठविल्याची कबुलीही दिलेली आहे.
नवी मुंबईतील कामोठे येथे राहणाऱ्या महेश पाटील, या कंपनीच्या कर्मचाऱ्याला GST इंटेलिजन्स विभागाने १२ डिसेंबर रोजी अटक केलेली आहे. त्याला १४ दिवसांची ज्युडिशिअल कस्टडीही देण्यात आलेली आहे. सध्या हा तळोजा येथील जेलमध्ये आहे.
पाटील हा वझिरानी याचा उजवा हात मानला जात असे. वझिरानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार सांभाळत असे. इतकेच नव्हे तर भारतातील कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम व परदेशी करन्सी 'हवाला'मार्फत पाठविण्याचे कामही तो करत असे.
नवी मुंबईच्या सीबीडी- बेलापूर येथील ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट कोर्टात पाटील याला आणण्यात आलेले होते. त्यावेळी 'स्प्राऊट्स'चे पत्रकार हजर होते. त्यामुळे अधिक माहिती मिळालेली आहे.
वझिरानी व त्याच्या कंपनीची ३५ हून अधिक बँक खाती आहेत. त्यातील २ ते ३ वगळता इतर खाती ही undecleared आहेत. या खात्यातील आर्थिक व्यवहार हे कोट्यवधी रुपयांचे आहेत व ते सर्वच संशयास्पद आहेत. या खात्यातच पाटील हा नियमबाह्य पद्धतीने मिळवलेला काळा पैसे डिपॉझिट करत असे.
न्यायालयात पाटील याने गुन्हा कबूल केलेला आहे. त्यासंबंधीच्या रिमांड अप्लिकेशनमध्ये नमूद केलेले आहे की, त्याने ५०० कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार हे 'हवाला'मार्फत केलेले आहेत. हे सर्व व्यवहार पाटील हा वझिरानी यांच्या सूचनेनुसार करत असे, असे पाटील याने कबूल केलेले आहे. यामध्ये वझिरानी व त्याच्या कंपनीने सरकारचा जवळपास १०० कोटी रुपयांचा टॅक्स बुडवलेला आहे, हेही उघडकीस आलेले आहे.
पाटील याची लवकरच अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच 'इडी'मार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर संजय मनोहर वझिरानी याने तपासात सहकार्य न केल्यास त्यालाही अटक होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे आशियातील सर्वात मोठे प्रदर्शन व अधिवेशन केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. या केंद्राचे नाव इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर (IICC) 'यशॊभूमी' (Yashobhumi) आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले आहे. हा पहिला टप्पा बांधण्यासाठी तब्बल ५४०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे.
सध्या 'यशॊभूमी'च्या संपूर्ण कामाचे कंत्राट हे KINEXIN Convention Mangement Private Limited या कोरिया देशातील कंपनीला मिळालेले आहे. (भारतीय कंपनीला नाही)
या कुरियन कंपनीने केटरिंगचे subcontract हे 'Foodlink F&B Holdings' या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिलेले आहे. हे उपकंत्राट मिळावे, यासाठी संचालक संजय मनोहर वझिरानी ( Sanjay Manohar Vazirani) जोरदार लॉबिंग करत होते, त्यात त्यांना यशही मिळलेले आहे.
संजय वझिरानी यांच्या या कंपनीने आतापर्यंत इशा अंबानी व आनंद पिरामल (Isha Ambani and Anand Piramal), आकाश अंबानी व श्लोका मेहता ( Aakash Ambani and Shloka Mehta), रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण (Ranveer Singh and Deepika Padukone) या व इतर अनेक हाय प्रोफाइल लोकांना केटरिंगची सुविधा पुरवलेली आहे. याशिवाय G20 summit in Delhi, Men's world Cup 2023, IPL 2023 येथेही केटरिंगसंदर्भातील सेवा पुरवलेली आहे.
संजय वझिरानी हा इसम अशा प्रकारच्या कामांसाठी लॉबिंग करण्यात तरबेज आहे. मात्र हा इसम सपशेल फ्रॉड व टॅक्स बुडवणारा आहे. सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्याबद्दल हा GST Intelligence Department च्या रडारवर आहे, त्यामुळे त्याला केंद्र सरकारच्या 'यशॊभूमी'चे कंत्राट देण्यात येऊ नये, अशी विनंती 'स्प्राऊट्स'च्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व KINEXIN Convention Mangement Private Limited या कंपनीला करण्यात आलेली होती, मात्र तरीही केटरिंगसंदर्भातील कोट्यवधी रुपयांचे कंत्राट हे या कंपनीला देण्यात आले.
यासंदर्भातील बातमीही दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोजी 'स्प्राऊट्स'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या बातमीचे कात्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी व 'KINEXIN'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आलेले होते. इतकेच नव्हे तर 'स्प्राऊट्स'ला यापुढील बातमीच्या फॉलोअपसाठी प्रतिकिया देण्याची KINEXIN ला विनंती करण्यात आलेली होती. यावर कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र हाच मेल कंपनीने संजय वझिरानी यांना फ़ॉरवर्ड केलेला होता, असे वझिरानी यांनी स्प्राऊट्सला पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केलेले आहे.
KINEXIN ने फॉरवर्ड केलेला हा मेल मिळाल्यानंतर फ्रॉड व महाभ्रष्ट वझिरानी यांनी ही बातमी चक्क खोटी आहे, असा कांगावा केला, कायदेशीर नोटीसही पाठवली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 'स्प्राऊट्स'चे संपादक उन्मेष गुजराथी यांच्यावर १०० कोटी रुपयांचा दावाही ठोकलेला आहे. त्यासंबंधी लागणारी लाखो रुपयांची रक्कमही त्यांनी स्टॅम्पपेपरद्वारे भरलेली आहे.
'स्प्राऊट्स'चा आवाज दाबण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. वास्तविक ही कंपनी नियमबाह्य काम करणारी आहे व त्याचे मालक संजय वझिरानी हा फ्रॉड आहे, त्यामुळे या कंपनीवरच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी 'स्प्राऊट्स'ने केलेली आहे.
'स्प्राऊट्स'चा न्यायदेवतेवर विश्वास आहे. लाखो वाचकांची साथ आहे, त्यामुळे या दबावाचा काहीही उपयोग होणार नाही. वाचकांना हा लेख आवडल्यास जरूर शेअर करा. अशाच प्रकारचे काही घोटाळे असल्यास ९३२२७५५०९८ या मोबाईल नंबरवर शेअर करा व अशा महाभ्रष्ट लोकांविरोधात आवाज उठवा.
