पुजाऱ्यांसाठी मनसेकडून मानधन सुपूर्द!

सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी मनसेकडून मानधन सुपूर्द!

मालवण (जगदीश काशिकर) : मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पूजा अर्चा, कार्यक्रम व देखभाली साठी शासनाकडून ६ हजार रुपयांचे तुटपुंजे मानधन दिले जाते.
अनेक लोकप्रतिनिधीनी यासाठी निधी देण्याची दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. त्यामुळे यासाठी मनसेने पुढाकार घेऊन शिवराजेश्वर मंदिराच्या पूजाऱ्यांसाठी २५ हजार रुपयाचे मानधन मंदिराचे पुजारी सयाजी सकपाळ यांच्याकडे सुपूर्द केले असून दरवर्षी मनसेकडून शिवराजेश्वर मंदिरासाठी वाढत्या पटीत मानधन देण्यात येणार आहे,अशी माहिती मनसेचे सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक आणि मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री संदीप दळवी यांनी मालवण येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.