आम आदमी पक्षाचे (आप) राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी ऊघड केला परिक्षातील गैरप्रकार व केली चौकशीची मागणी !!
मुंबई (जगदीश का. काशिकर) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध पदांसाठी दि. १३ डिसेंबर २०२३ ते २८ डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्यभरात परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या कालावधीत लातूर येथील COSS कॉम्पुटर इन्स्टिट्युट या खाजगी परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याचा विडिओ समाज माध्यमांवर फिरत असून या परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्या चा आरोप परीक्षार्थी उमेदवारांकडून करण्यात आला आहे. हि परीक्षा TCS ION या कंपनी मार्फत घेण्यात येत आहे. TCS ION या कंपनीच्या परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षकच उमेदवारांना उत्तरे पुरवीत असल्याचे तलाठी भरतीत समोर आले होते. आपल्या अधिकृत परीक्षा केंद्राबरोबरच TCS ION कंपनीने COSS कॉम्पुटर इन्स्टिट्युट सारख्या अनेक खासगी परीक्षा केंद्रांना परीक्षा घेण्यासाठी नियुक्त केले आहे.
या घटनेतील खासगी परीक्षा केंद्र चालक उमेदवारांना मदत करत असल्याचे परीक्षार्थी उमेदवारांचे म्हणणे आहे, या खासगी परीक्षा केंद्रांवर नियुक्त केले जाणारे पर्यवेक्षक कंत्राटी पद्धतीने / रोजंदारीवर नियुक्त केलेले असतात. लातूर येथील COSS कॉम्पुटर इन्स्टिट्युट या परीक्षा केंद्राबाहेरून पसरलेल्या झालेल्या बातमीमध्ये परीक्षार्थी उमेदवार परीक्षा केंद्रात झालेल्या गैरप्रकाराबद्दल सांगत आहेत. परीक्षेचा पेपर सोडवताना, उमेदवारांना कच्च्या कामासाठी रफ पेपर दिला जातो, त्या रफ पेपरवर एका विशेष उमेदवाराला उत्तरे पुरविण्यात आल्याचा आरोप इतर उमेदवारांनी केला आहे. उमेदवारांनी सदर घटनेबद्दल तक्रार केल्यानंतर, आरोपी उमेदवाराने चक्कर आल्याचे नाटक केले आणि त्यानंतर परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सदर उत्तर असलेली रफ शीट नाहीशी केली. या सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आहेत.
उमेदवारांनी केलेल्या आरोपांच्या बातमीची टेलिग्राम चॅनलची लिंक खालील प्रमाणे आहे - t.me/mpscandolan/81… तसेच ट्विटर लिंक पुढील प्रमाणे आहे. : x.com/Mpsc_Andolan/s…
उमेदवाराकडे उत्तरे असणारा कच्चा पेपर बाहेरून पुरविण्यात आला याचा अर्थ परीक्षेची प्रश्नपत्रिका त्याच अथवा इतर परीक्षा केंद्रावरून फोडल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नक्की अशा किती परीक्षा केंद्रावर याप्रकारे पेपर फोडण्यात येत आहेत याबद्दल सखोल तपास गरजेचा आहे, म्हणून आपणांस विनंती करण्यात येत आहे कि आपण या परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही हस्तगत करून तपासाअंती गैरप्रकार झाला असल्याचे स्पष्ट झाल्यास सदर परीक्षा केंद्राच्या मालकावर आणि कर्मचाऱ्यांवर FIR दाखल करण्याचे आदेश द्यावेत. तसेच हि परीक्षा झालेल्या इतर कोण-कोणत्या जिल्ह्यात असे गैरप्रकार घडले आहेत याचा छडा लावण्याचे आदेश यावा. सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता हे अत्यंत महत्त्वाचे पद असून सिव्हिल अभियांत्रिकी उमेदवार अनेक वर्षांपासून या जाहिरातीची वाट बघत होते परंतु परीक्षेत घडणारे गैरप्रकाराच्या घटनेमुळे लाखो परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आपल्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून ते नैराश्यात आहेत. या गैरप्रकारात सामील असणाऱ्या सर्व आरोपींचा छडा लावून सखोल तपास करण्यात यावा आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश यावेत ही नम्र विनंती.
