नागपुर (वि.प्र.) : नागपूर येथून दरमहा प्रकाशित होणाऱ्या भोई गौरव मासिकाच्या नियमित प्रकाशनाला 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या मासिकाचा पाचवा वर्धापन दिन समारंभ शिक्षक सहकारी बँक सभागृह महाल नागपूर येथे रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. या समारंभात सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला,क्रीडा, संगीत, नाटक, चित्रपट, शिक्षण, सहकार, उच्चपदस्थ, अधिकारी, उद्योग, व्यापार इत्यादी क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या भोई समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या समारंभाचे उद्घाटन डॉ मिलिंद भोई अध्यक्ष भोई प्रतिष्ठान पुणे व (राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते) यांचे हस्ते होईल तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री रमेशजी वानखेडे उद्योजक अकोला हे राहतील कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री प्रकाशन नंदाने उद्योजक अकोला, श्री गजेंद्र बावणे उप-आयुक्त अमरावती, डॉ.अजय कांबळे नाक कान घसा व कॅन्सर तज्ञ चंद्रपूर, डॉ. राजेश डहारे प्र. प्राचार्य सर्वोदय महाविद्यालय शिंदेवाडी जिल्हा चंद्रपूर, श्रीमती अश्विनी भोई उद्योजक फलटण जिल्हा सातारा, श्रीमती नलिनी कारळे भोई समाज महिला आघाडी संघटन (वधू वर मंडळ पुणे) इत्यादी उपस्थित राहतील.
10 जानेवारी 2024 पर्यंत भोई गौरव पुरस्कारासाठी नामांकन मागविण्यात आले होते. ज्यांनी नामांकन पाठविले व ज्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली अशा सर्व पुरस्कार प्राप्त समाज बांधवांना भोई गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच स्व.खासदार जातिरमजी बर्वे स्मृती विशेष अंकाचे प्रकाशन सुद्धा या प्रसंगी करण्यात येईल.
यापूर्वी झालेल्या समारंभात भोई समाजातील अनेक मान्यवरांना, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या समारंभाला संपूर्ण महाराष्ट्रातून भोई गौरव चे सभासद, प्रतिनिधी,हितचिंतक, शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.भोई समाज बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भोई गौरव मासिकाचे मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकार द्वारे केले आहे.
