नेट/ सेट/ जीआरफ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन.!
भद्रावती (वि.प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, एन. एस. एस. व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेची तयारी - नेट/ सेट/ जीआरफ यावर एक दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ ए. बी. धोटे, प्रमुख वक्ते डॉक्टर अनिल करवंदे, नागपूर व श्रीमती संगीता खरे, नागपूर, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गजेंद्र बेदरे उपस्थित होते. सर्वप्रथम भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक सचिव स्वर्गीय निळकंठराव शिंदे यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी प्रा. डॉ गजेंद्र बेदरे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून या कार्यक्रमा मागचा हेतू स्पष्ट करीत सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळवण्याचा विचार करावा असे आवाहन केले. या राष्ट्रीय सेमिनारचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर अनिल करवंदे, नागपूर यांनी पावर पॉइंट च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा म्हणजे काय तसेच शिक्षक क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण करणे कसे अनिवार्य आहे तसेच या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो यावर सखोल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या नेट/ सेट/ जीआरएफ बद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली व विद्यार्थ्यांच्या समाधान केले.
तसेच श्रीमती संगीता खरे, नागपूर यांनी स्पर्धा परीक्षेसाठी लागणारा अभ्यासक्रम, परीक्षा फीस, अभ्यासासाठी लागणारे साहित्य, वेळेचे नियोजन यावर आपले विचार व्यक्त केले. तसेच याप्रसंगी या राष्ट्रीय सेमिनारचे आयोजक भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती चे सहसचिव डॉक्टर विशाल शिंदे यांनी स्पर्धा परीक्षा नेट-सेट यांना सामोरे जाताना आपण कशा पद्धतीने तयार करावी याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले व भविष्यात आपण अशा प्रकारच्या राष्ट्रीय सेमिनारचे पुन्हा आयोजन करू असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे उपप्राचार्य व विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. ए. बी. धोटे यांनी सर्वप्रथम प्रमुख मार्गदर्शक यांचे स्वागत व आभार व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी सुद्धा आजच्या आव्हानांच्या जगामध्ये रूढीवादी करियर सोडून नवीन क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवावे आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व मोठे प्राध्यापक व्हावे. स्वतःमध्ये बदल घडवणे ही आजच्या काळाची गरज आहे असे आवाहन केले. या या राष्ट्रीय एकदिवसीय सेमिनारच्या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र बेदरे तर आभार प्रदर्शन डॉक्टर एन. एस. वाढवे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता डॉॅ. गजेंद्र बेदरे, प्राध्यापक डॉक्टर शशिकांत सित्रे, प्राध्यापक डॉक्टर कादरी, प्रा कुलदीप भोंगळे प्रज्वल मत्ते , कोमल जंगापली, अनामिका चौधरी, सुरज जीवतोडे व हेमांगी शेटे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
