बल्लारपुर (का.प्र.) : जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.प्रथमता: राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.मान. बी. बी. भगत मुख्याध्यापक यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांची अगुवाई एस. एम. चव्हाण स्काऊड गाईड शिक्षक यांनी केली.नंतर विद्यार्थ्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आलेत.त्यामध्ये अप्सरा ग्रुप तर्फे आई तुझे देऊळ आणि रंगीला मारो ढोलना, बादल बरसा, भीमाची लेक मी, मला लागली कुणाची हिचकी, तेरी नदियो मे, ठुमक ठुमक, तिरंगा प्यारा आदी गाण्यांचा समावेश होता.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन आर. बी. अलाम आणि आभार प्रदर्शन एस. एन. लोधे मॅडम यांनी केले.शेवटी चॉकलेट वाटप करण्यात आले.कार्यक्रमात एम. डी. टोंगे, आर. के. वानखेडे, यु. के. रांगणकर, वाल्मीक खोंडे, वामन बोबडे, इंद्रभान अडबाले तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत खरी कमाई कार्यक्रम .!
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत नुकताच खरी कमाई हा कार्यक्रम घेण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट व गाईड शिक्षक एस. एन. लोधे मॅडम व एस. एम. चव्हाण यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते.