राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात स्त्रिया व मुलींची आरोग्य तपासणी व औषधी वाटप .!

भद्रावती (वि.प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर स्वर्गीय मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय, चोरा येथे सुरू असून पाचवा दिवशीच्या बौद्धिक सत्रात स्त्रियांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सौ. ए बी धोटे तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. सौ. प्रिया वि. शिंदे, शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भद्रावती तसेच राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक डॉ गजेंद्र बेदरे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलाने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शक डॉ. सौ. प्रिया वि. शिंदे यांनी स्त्री आरोग्याची काळजी कशी घ्यायची तसेच स्त्रियांना होणारे रोग ते होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी त्याच पद्धतीने स्त्री आरोग्य जर चांगले असेल तर कुटुंबाचे आरोग्य सुद्धा चांगले राहील स्त्रियांनी स्वच्छता ही अंगीकारली पाहिजे ती मग स्वतःची असो की घराचे याविषयी विस्तृत अशी माहिती दिली.या शिबिरा अंतर्गत आजच्या दिवशी 55 स्त्रियांची तसेच मुलींची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधी वितरित करण्यात आली.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ ए बी धोटे यांनी स्त्रियांमध्ये खूप शक्ती असते तर त्यांनी ती शक्ती ओळखण्याची गरज आहे कोणत्याही कुटुंबाचा मुख्य पाया एक स्त्रीच असते त्यामुळे तिने स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवले पाहिजे असे आपले मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन प्रतीक्षा कुरेकर व स्नेहल निपुंगे तर आभार प्रदर्शन रागिनी निखाडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अनामिका चौधरी,सुरज जीवतोडे अथक परिश्रम केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.