मुंबई (जगदीश काशिकर) : आज राज्यात जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे जवळपास रोजचे झाले आहे. पेपर फुटी प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही, यामुळे आम आदमी पार्टीने राज्यभर "आक्रोश मोर्चा" काढून सरकारचे लक्ष वेधले आहे.
धनंजय रामकृष्ण शिंदे, उपाध्यक्ष, आप, महाराष्ट्र : हमखास सरकारी नोकरी मिळत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या तरुणांनी आज कोणाकडे न्यायाची अपेक्षा करायची असा प्रश्न आम्ही सरकारला विचारत आहोत. जर हे पेपर फुटीचे प्रकरण यापुढेही चालू राहिले तर आम आदमी पार्टी उग्र आंदोलन करेल असा इशारा आम्ही सरकारला देतो आहे.
देवेंद्र फडवणीस हे गृहमंत्री असताना सुद्धा या महत्वाच्या पेपर फुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकाराची कठोर कारवाई अजून तरी फडवणीस यांनी केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे असा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीचा आहे.
आम आदमी पार्टीच्या राज्यस्तरीय आक्रोश मोर्चात राज्यातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्पर्धा परीक्षा देत असलेले विद्यार्थी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते
आम आदमी पार्टीने सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत :
१. सदोष "तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून, तलाठी तसेच सर्व परीक्षा "महाराष्ट्र लोकसेवा आयोग" (MPSC) मार्फत घेतल्या जाव्यात.
२. नोकभरती परीक्षेत झालेल्या "पेपरफुटी"ची चौकशी करण्यासाठी ताबडतोब मा. न्यायालयाच्या निगराणीखाली "विशेष चौकशी समिती"ची स्थापना करून पुढील ४५ दिवसांत समितीला अहवाल सादर करावयास सांगावा.
३. पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदे बनवावेत. पेपरफुटीतील गुन्हेगारांना "जन्मठेपेची शिक्षा" व रु. १० कोटी इतका कठोर दंड आकारण्याचा कायदा बनवावा.
५. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण कायमचे रद्द करण्यात यावे.
नाशिक येथे होणा-या राष्ट्रीय सायबर कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून एडवोकेट चैतन्य भंडारी यांची निवड .!
धुळे - दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथे होणा-या भारतातील राष्ट्रीय कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून धुळे येथील सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांची निवड झाली आहे. यात भारतभरातून विविध शाळा, महाविदयालयातील विदयार्थी गण उपस्थित राहणार असून त्यांना भारतातून विविध सायबर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यात अॅड. भंडारी हे प्रमुख वक्ते म्हणून भूमिका मांडणार आहे. सदरील राष्ट्रीय सायबर सेक्युरिटी कॉन्फरन्स, नाशिक चॅप्टरचे आयोजक स्वरदा कखनुरकर (व्हाईट बॅण्ड असोसिएटस्) यांनी आयोजित केली आहे. सदरील राष्ट्रीय कॉन्फरन्स येथे श्री. तपनकुमार झा, रिध्दी सोरल व दीपक राज राव,दिल्ली हे या सायबर तज्ञांचा देखील समावेश असणार आहे. सदरील एकदिवसीय राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये संपुर्ण भारतातून आलेल्या विदयार्थी, डॉक्टर, इंजिनिअर्स, शिक्षक तसेच सर्वसामान्य नागरीकांना अॅड. भंडारी हे मार्गदर्शन करणार आहे तसेच त्यांना सायबर सेक्युरिटी विषयी ज्ञान देणार आहे, म्हणून नागरीकांनी मोठया संख्येने या राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये उपस्थित राहून सायबर सुरक्षिततेसंबंधी जागरुक रहावे.