"राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं हिरेजडित रत्न" - गजानन राणे

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस श्री गजानन नारायण राणे (भाई) - यांची मनोगत


मुंबई (जगदीश काशिकर) : राज ठाकरे म्हणजे अस्सल मराठी व्यक्तिमत्व, राज ठाकरे म्हणजे धर्मांध नव्हे तर धर्माभिमानी हिंदू, राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, राज ठाकरे म्हणजे सत्य आणि असत्य ह्यातला फरक अधोरेखित करणारा दुवा, राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्र प्रेमाचं निस्सीम उदाहरण, राज ठाकरे म्हणजे ह्या इथल्या महाराष्ट्राच्या मातीला आणि आई समान असलेल्या मराठी भाषेलाही अभिमान वाटावा असा जिगरबाज सुपूत्र, आपली अस्मिता जपणारा अन् मातृभाषेवर जीवापाड प्रेम करणारा नेता. दुर्दैवाने ह्याच मातीत जन्माला आलेल्या काही नतदृष्ट लोकांना राज ठाकरे कळले नाहीत किंबहुना मुद्दामहून कळवून घ्यायचे नाहीत कारण राज ठाकरेंचं महाराष्ट्रात वजन वाढलं तर इतर राजकारण्यांची झोळी कायमच रिकामी राहील ह्यामुळे वरकरणी राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत असं सांगून त्यांच्याविषयी आदरभाव, ममत्व दाखवणारे सर्वपक्षीय नेते आतून मात्र राज ठाकरेंशी तितकेच प्रामाणिक नाहीत. हे ही तितकेच खरे आहे. राज ठाकरेंसारखा सह्याद्री सम कणखर नेता इतर दुसऱ्या कुठच्या राज्यात जन्माला आला असता तर त्या राज्याने राज ठाकरेंना डोक्यावर घेऊन त्यांच्या हातात सत्ता दिली असती परंतु दुर्दैवाने महाराष्ट्राची जनता राज ठाकरेंना अजूनही ओळखू शकली नाही. ह्यात राज ठाकरेंचं नव्हे तर महाराष्ट्राचं भलं मोठं नुकसान आहे. महाराष्ट्राचा सर्वच बाजूने होणारा ऱ्हास जर थांबवून महाराष्ट्राला त्याचं गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर महाराष्ट्रासमोर केवळ एकच पर्याय आहे. तो म्हणजे राज ठाकरे. हे जेव्हा महाराष्ट्राची जनता स्वतःचं समजून घेईल त्यादिवशी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा सुवर्ण दिवस असेल पण इथे समजून घ्यायचं कोणाला? इथे तर राज्यातील सर्वच पक्षांनी मिडीयाला हाताशी धरून, आयटी सेलला हाताशी धरून राज ठाकरेंची नाहक बदनामी केली. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असो इंदू मिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक असो टोलनाके असो वा कडवट मराठी भूमिका असो सगळ्यांनी राज ठाकरेंचा विरोध केला. आज ते सगळे मुद्दे निक्षून पहा राज ठाकरे जे तळमळीने बोलत होते ते प्रश्न आजही अडकून पडले आहेत आणि आपण भ्रामक कल्पनांच्या मागे धावतो आहे.
मराठी भाषा, भूमिपुत्रांना रोजगार, गड किल्ले संवर्धन, लोकपयोगी स्मारकं, टोलनाके, चांगले रस्ते, उत्तम आरोग्य व्यवस्था, शिक्षण, पर्यटन अर्थव्यवस्था, तुमच्या मुलांसाठी मोकळी मैदाने, तुमच्यासाठी मोकळा श्वास. जे जे राज ठाकरे बोलत होते, बोलत आहेत, बोलत राहतील हेच तर तुमचे मूळ प्रश्न आहेत. निवडणुका विकास कामांवर व्हाव्यात. कामे केली तरच मतं मागायला येणार अन्यथा मतं मागायला येणार नाही. हे त्यांनी ठासून सांगितलं अन् मिळालेल्या छोट्या शहरातल्या ५ वर्षे सत्ता काळात मी काय करू शकतो? अन् ५ वर्षाच्या केलेल्या कामाचा लेखाजोखा व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला. ह्या भारत देशात असं उदाहरण समोर ठेवणारे राज ठाकरे पहिलेच आणि एकमेव नेते आहेत पण वैचारिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्राने दुर्दैवाने राज ठाकरेंचे हे व्हिडिओ कधीच लक्षात घेतले नाहीत. त्यांनी लक्षात ठेवले ते फक्त "लाव रे तो व्हिडिओ" ह्यात राज ठाकरेंचा दोष तो काय? ह्याच वैचारिक महाराष्ट्राने आणखी समृध्द व्हायचं असेल तर "लाव रे तो व्हिडिओ" ऐवजी राज ठाकरेंनी केलेल्या कामाच्या प्रेझेंटेशनचे व्हिडिओ लक्षात ठेवले पाहिजेत, आठवले पाहिजेत. आजची ही सगळी दुर्दशा पाहता. महाराष्ट्राला ह्या राजकीय चिखलाच्या दलदलीतून बाहेर काढायचं असेल तर फक्त एकदा फक्त एकदा राज ठाकरेंवर विश्वास ठेवून बघा कारण आता राज ठाकरेंशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. महाराष्ट्राला त्याचं गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचं असेल तर केवळ राज ठाकरेच ही गोष्ट अमलात आणू शकतात. मराठी माणसाने राज ठाकरेंना महाराष्ट्राचं सारथ्य करण्याची संधी द्यायला हवी. तेव्हा त्यांच्या एका हातात महाराष्ट्रवाद असेल आणि दुसऱ्या हातात महाराष्ट्राचा विकास आराखडा असेल अन् इथूनच नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीची नवी कथा राज ठाकरेंच्या हातून लिहिली जाईल.

धर्मांतरित व्यक्तीला कोणतीही जात नसते. मग इतर धर्माना हिन्दूच्या जातीय आरक्षण देणे चुकीचे : अजय सिंह सेंगर , महाराष्ट्र करणी सेना


मुंबई : नुकतेच महाराष्ट्र मध्ये मराठा समाज यांनी मराठा जातीला ओबीसी मध्ये घ्या म्हणून आंदोलन केले या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जातीय व्यवस्थेचा अभ्यास करणे फार जरुरी झालेला आहे. मूळता आरक्षण हे हिंदू धर्मातील जाती करिता उपलब्ध असताना इतर धर्मीयांमध्ये जातीय व्यवस्था नसताना त्यांना हिंदूच्या जातीचे आरक्षण दिल्यामुळे देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे असे "महाराष्ट्र करणी सेना" प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी प्रतिपादन केले.
पुढे सेंगर म्हणतात की जाती व्यवस्था केवल हिन्दू धर्मात आहे, जातिव्यवस्था हे हिंदू समाजाचे अविभाज्य वैशिष्ट्य बनले आहे.
ख्रिस्ती आणि इस्लाम हे केवळ भारतातच नव्हे तर जगातील इतर देशांमध्येही प्रचलित असलेले धर्म आहेत. आम्हाला माहित आहे की इतर देशांमध्ये हे धर्म जातींच्या व्यवस्थेला त्यांच्या पंथाचा किंवा सिद्धांतांचा अविभाज्य भाग म्हणून मान्यता देत नाहीत.
इस्लामचा संबंध आहे तोपर्यंत जातिभेदावर आधारित कोणताही भेद सहन करत नाही असा प्रश्नच उद्भवत नाही. पोटजातींपैकी एका जातीचा सदस्य जेव्हा इस्लाम स्वीकारतो तेव्हा तो कोणत्याही जातीचा सदस्य राहणे बंद करतो. तो फक्त एक मुस्लिम बनतो आणि मुस्लिम समाजातील त्याचे स्थान त्याच्या धर्मांतराच्या आधी तो कोणत्या जातीचा होता त्यावरून निश्चित होत नाही. ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण झाले असतानाही हे असेच असते. सामान्य नियम असा आहे की धर्मांतर हे जातीतून हकालपट्टी किंवा जातीचे सदस्यत्व थांबणे दुसऱ्या शब्दांत, धर्मांतरित व्यक्तीला कोणतीही जात नसते.
हिन्दूत जात ही आता आपल्याला समजते ती एक सामाजिक जोडणी आहे ज्याचे सदस्य नावनोंदणीने नव्हे तर जन्मानुसार नोंदवले जातात. एखादी विशिष्ट व्यक्ती अन्यथा अनुसूचित जातीची सदस्य असेल परंतु ती व्यक्ती हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचा दावा करत असल्याने तिला अनुसूचित जातीच्या श्रेणीतून बाहेर काढले जाते. कलम ३४१ अंतर्गत राष्ट्रपतींच्या अधिकारांच्या पलीकडे हे आहे.
म्हणून जातीय व्यवस्था नसलेल्या ख्रिस्ती व इस्लाम धर्मा च्या व्यक्तींना हिंदूचे जातीय आरक्षण देण्याचे कारण काय ? हिंदूच्या वाट्याचं हे आरक्षण यांना दिल्याने हिंदूच्या आरक्षित जातीवर तो एक अन्याय ठरत आहे.
सोनिया गांधी ही ख्रिस्ती असल्याने तिने आपला प्रभाव पडून ख्रिस्ती धर्माच्या व्यक्तींना हिंदूंच्या जातीय आरक्षणाचे फायदे करून दिले जे देशाच्या मूळ संविधान विरोधात आहे. तसेच बौद्ध धर्म सुद्धा जातीय व्यवस्था नाही हे मद्रास उच्च न्यायालय यांनी निकाल दिला. 
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जात निर्मूलनाकरिता जाती व्यवस्था नसलेला बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणून "सर्वश्रेष्ठ बौद्ध धर्म" स्वीकारलेल्या व्यक्तींना तुम्ही हिंदू जातीचा उल्लेख करावा असे म्हणणे योग्य ठरणार नाही . 
हिंदू धर्म त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्या व्यक्तीचा हिन्दू च्या अनुसूचित जातीचा सदस्य राहणे थांबते. बुद्ध धर्मात जाती व्यवस्था नाही. मद्रास उच्च न्यायालय यानी सुद्धा G. J. Tamilarasu versus State Of Tamil nadu यानी 2018 ला निकाल दिला. 
व महाराष्ट्र शासन द्वारा प्रकाशित " डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 3 मध्ये पेज नंबर 467 "भाकरी पेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे" या शीर्षकाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे म्हटले आहे की, " दुसऱ्या कोणत्याही धर्मापेक्षा बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर बौद्ध धर्म चा या वर्षी स्वीकार करावा, मी या बाबतीत तुमच्यावर सक्ती करणार नाही, हा तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे, परंतु माझ्या बौद्ध धर्मग्रहणानंतर मी अपृश्य राहणार नाही"
तसेच पेज न. 530 मध्ये, "हे भिक्षु हो, तुम्ही निरनिराळ्या देशातून व जातीतून आला आहात, आपल्या प्रदेशामधून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक असतात. मात्र त्या सागराला मिळाल्या की त्या पृथक राहत नाही त्या एकजीव व समान होतात, बौद्ध संघ या सागराप्रमाणे आहे या संघात सर्व सारखे व समान सागरात गेल्यावर गंगेचे पाणी किंवा हे महानदीचे पाणी असे ओळखणे अशक्य असते त्याप्रमाणे बौद्ध संघात (धर्मात) आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात" 
असे महान विचार त्यानी व्यक्त केले. बुद्धधर्म स्वीकार केल्यावर हिंदू धर्माचे आणि रूढी, प्रथा, परंपरा, संस्कार जातीचे नियम पालन करण्याचे बंधन आपोआप थांबते. तो नवीन बौद्ध धर्माचे नियम व आचरण करण्यास आतुर झालेला असतो.
हिंदू धर्मात त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या करणाऱ्यांना हिंदू धर्माच्या जातीचा उल्लेख करा असे म्हणणे हे संविधान विरोधी कृती आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा हा एक प्रकारे अपमान होईल. जातीय व्यवस्था नसलेला बौद्ध धर्म हा खरोखर सर्वश्रेष्ठ आहे असे सेंगर म्हणतात. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर या देशात जाती चे निर्मूलन झाले असते हे हिंदू धर्माकरिता फायदेशीर ठरले असते.
जातीय व्यवस्थेमुळे हिंदू धर्माचे प्रचंड असे नुकसान होत आहे, कारण जातीय व्यवस्थेला कंटाळून अनेक जण हिंदू धर्म त्याग करत आहे आपल्याला नाकारता येत नाही असे सेंगर म्हणतात.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.