नरेश बाबू पुगलिया यांच्या हस्ते बल्लारपूर येथील इंदिरा गांधी स्टेडियमचे उद्घाटन .!
बल्लारपुर (का.प्र.) : भारतीय प्रजासत्ताकच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या शुभ मुहूर्तावर बल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्रस्ट संचलित स्थानिक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, बल्लारपूर येथे इंदिरा गांधी स्टेडियमचे उद्घाटन माजी खासदार व कामगार नेते नरेश बाबू पुगलिया यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बल्लारपूर पेपर मिलचे युनिट हेड उदय कुकडे, प्रवीण शंकर, राहुल पुगलिया, रजत शेणॉय, कुणाल शेखर, अजय दुर्गकर, देवेंद्र बेले, अशोक नागापुरे, नाना बुंदेल प्रमुखाने उपस्थित होते.
या प्रसंगी माजी खासदार व कामगार नेते नरेश बाबू पुगलिया म्हनाले की बल्लारपूर येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या स्टेडियमचा विद्यार्थ्यांना भविष्यात खूप फायदा होणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे तारासिंग कलसी, वसंत मांधरे, रामदास वागदरकर, कृष्णन नायर, वीरेंद्र आर्य, अनिल तुंगीडवार, उमेश कोलावार, गजानन दिवसे, सुदर्शन पुली, आशिष मोहता, गजेंद्र सिंग, विनोद महातो यांनी परिश्रम घेतले.