आपले वाहन व्यवस्थितरित्या योग्य ठिकाणी लावावे - सुधाकर यादव.!
चंद्रपूर (वि.प्र.):चंद्रपुर येथील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व मस्जिद व मदरसा मौलाना, पदाधिकारी सह शांतता समिति ची बैठक रमजान ईद संबंधाने दिनांक 9 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता चंद्रपूर चे उप विभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
चंद्रपुर चे उप विभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी सर्वाँना ईद ची नमाज पठण करण्यासाठी जात असताना आपले वाहन व्यवस्थितरित्या योग्य ठिकाणी लावल्यास कोणालाही त्रास होणार नाही, कारण की नमाज पूर्ण झाल्यानंतर सर्वाँना जाण्याच्या घाई असते कोणालाही कोणतीही दुखापत होणार नाही याची दखल घेऊन योग्य ठिकाणी आपले वाहन पार्क करावे, या सह मार्गदर्शन पर अनेक सूचना दिल्या व सर्वाँना आगामी रमजान ईदच्या शुभेच्छा ही दिल्या.रामनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांनी सुद्धा रमजान ईदच्या शुभेच्छा देत.शांतता समिती व मस्जिद पदाधिकारी यांच्या कडून मिळालेल्या सूचनानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असे सांगितले.ही बैठक रामनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांनी आयोजीत केली होती.
या बैठकित जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमज़ान अली, सदानंद खत्री, ताजुद्दीन शेख, सैजुद्दीन शेख, हाजी अब्दुल कदीर,मोहम्मद हफीजुर रहमान,पंजाबराव मडावी, राजेंद्र सिह गौतम, ताज मोहम्मद खान,मोहम्मद साबिर,जफिर शेख,नफीस अहमद,अब्दुल रब सिद्दीकी, फिरोज खां सह विशेष शाखेचे दिलीप कुर्झेकर,सुभाष सिडाम,राजू अरवेल्लीवार,दिनेश वाकडे सह अन्य मान्यवर ही उपस्थित होते.