बल्लारपुर (का.प्र.) : बामणी दुधोली येथे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रातुन काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेला युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. प्रतिभाताई धोनोरकर यांनी आपल्या भाषांनातून जनतेच्या विविध प्रश्नावर भाष्य केले व आपल्याला निवडून देण्याचे जनतेला आवाहन केले.प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचार सभेसाठी कार्यकर्त्यानी ताईला भरघोष मतांनी बामणी गावातून लीड देण्याचा निर्धार केला. याप्रसंगी कॉग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरद पवार,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.