माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे प्रचंड भ्रष्टाचार .!

बोगस मान्यता आणि बोगस शालार्थ आयडी धारक कर्मचाऱ्यांचे पगार सुरू .!

बल्लारपूर (का.प्र.) : माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील एका शाळेच्या 11 कर्मचाऱ्यांना बोगस मान्यता प्रदान करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्या बोगस शालार्थ आयडी बनवण्यात आल्या होत्या. त्यांना मान्यता प्रदान करताना त्यांच्या फायली माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे अस्तित्वात नाहीत. तसेच शालार्थ आयडी बनवत असताना भविष्य निर्वाह निधी वेतन पथक चंद्रपूर तर्फे कोणतेच कागदपत्र अस्तित्वात नाहीत.
असे असताना मार्च महिन्यात शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व भविष्य निर्वाह निधी पथक चंद्रपूर यांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी साठगांठ करून या 11 बोगस मान्यता प्रदान असलेल्या व बोगस शालार्थ आयडी असलेल्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन काढलेले आहे.
तत्कालीन शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांची बदली झाल्यानंतर हा कारनामा झाला आहे. 
सदर कारस्थान कोणाच्या भरवशावर( पाठबळावर) घडवून आणले हा संशोधनाचा विषय आहे.
विद्यमान शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नाही.
भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक चंद्रपूर यांचे विद्यमान अधिकारी( अधीक्षक) यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मला याबद्दल काही कल्पना नाही ही बाब मी चार्ज घ्यायच्या आधीची आहे.
मान. शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्याशी फोनवरून संपर्क करून त्यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी असे सांगितले की, मला याबद्दल काहीच कल्पना नाही आणि माझ्याकडे मागे तक्रार प्राप्त झाली होती तेव्हापासून पगार बंद होता. पगार सुरू कसा झाला. याबाबत आपण माझ्याकडे तक्रार करा. संबंधितावर कारवाई करून पगार वसुली करण्यास आदेश देणार.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश प्राप्ती .!
माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांची विभागीय चौकशी आदेश.!

बल्लारपूर : माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांना त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 च्या नियम 10 अन्वये कारवाई करण्याचे ठरवण्यात आले आहे. 
अशा प्रकारचे पत्र मान. विभागीय उपसंचालक नागपूर विभाग नागपूर क्रमांक आस्था-अ- 103/ नाग/ वि. उ. सू./ शिअ(मा)/ चंद्र./ 529 दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी प्राप्त झाले आहे मान. सुरज मांढरे( भा. प्र. से.) आयुक्त शिक्षण महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय पुणे तर्फे प्राप्त झाले आहे.
ज्याबाबतीत प्रस्तावित कारवाई करण्याचे योजले आहे, त्या गैरशिस्तीच्या किंवा गैरवर्तणुकीच्या दोषारोपचे विवरणपत्र सोबत याप्रमाणे आहे.
1) श्री. रामदास गिरटकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक इंदिरा गांधी वरूर रोड राजुरा जिल्हा चंद्रपूर यांना तात्पुरते सेवानिवृत्ती वेतन मंजूर न करणे.
2) कार्यालयीन कामकाजावर अधिनस्त कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे, दप्तर दिरंगाई करणे.
3) लोकसेवा हमी कायद्यांतर्गत चुकीचा अहवाल सादर करणे.
 यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.
याबाबत नागो गाणार माजी शिक्षक आमदार नागपूर विभाग यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.