चंद्रपुर (वि.प्र): रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक २२/०५/२०२४ रोजी सायंकाळी 07/00 वाजता बुद्ध पौर्णिमा निमित्याने पोलीस स्टेशन रामनगर येथे रामनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या बैठकीत जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली,राजेंद्रसिंह गौतम, सदानंद खत्री, पियूष मेश्राम सह बुद्ध पौर्णिमा आयोजन समिती चे प्रफुल कुचनकर, भीमराव भगत,मनोज मुन, संजय सहारे, श्रावण रामटेके,दुष्यंत नगराळे,प्रदीप टिपले सह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली.
आयोजित बैठकीत पोलीस स्टेशन रामनगर चे पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांनी सर्वांना महत्त्वाचे मार्गदर्शन करीत 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमा उत्सव अतिशय आनंदाने उत्साहाने विशेषत शांततेने पार पाडावे अशी विनंती केली.
विशेष शाखेचे सुभाष शिडाम हे या प्रसंगी उपस्थित होते.