यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम .!
भद्रावती (वि.प्र.) : नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. यात भद्रावती तालुक्यातील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातुन प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथील विज्ञान शाखेतील बारावी ची विद्यार्थिनी कु. संजना गुरचल डिफेन्स हीने 89.50% गुण घेत तालुक्यातून व महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. याच शाळेतील मानस पारधी विंजासन ह्याने 85% गुण घेत महाविद्यालयातून तृतीय क्रमांक घेतला आहे. कला शाखेत कु.जान्हवी सूर्यवंशी गुरू नगर भद्रावती ह्या विद्यार्थीनींने महाविद्यालयातून प्रथम 79 टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला तर कु. दिया सेनगुप्ता ह्या विद्यार्थ्यीनीने 73 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून व्दितीय क्रमांक प्राप्त केला.
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती व भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती यांच्य वतीने प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांच्या मार्गदर्शनात या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन पालकांसह विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी प्राध्यापक डॉ सुधीर मोते, डॉ ज्ञानेश हटवार, किशोर ढोक, डॉ प्रशांत पाठक हे प्रामुख्याने उपस्थित होते. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार केल्याने त्यांच्या पालकांनी आश्चर्यसह आनंद व्यक्त केला व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.