भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा चार्टर्ड अकाउंटंट प्रणव आष्टीकर यांच्या केंद्रीय अर्थसंकल्प- 2024 व्याख्यानाचे आयोजन .!
भद्रावती (वि.प्र.) : स्थानिक - निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती व निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चार्टर्ड अकाउंटंट श्री प्रणव आष्टीकर यांच्या केंद्रीय अर्थसंकल्प - 2024 या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष, डॉ. विवेक शिंदे, प्रमुख व्याख्याते नागपूर येथील चार्टर्ड अकाउंटंट, श्री प्रणव आष्टीकर, प्रमुख पाहुणे डॉ. प्रिया शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे संस्थापक सचिव स्वर्गीय निळकंठराव शिंदे यांच्या प्रतिमेला मल्ल्यार्पण व पाहुण्यांच्या स्वागताने झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी केले त्यामध्ये त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट करीत केंद्रीय अर्थसंकल्प- 2024 सर्वांनी समजून घेण्याचे आवाहन केले.
तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नागपूर येथील चार्टर्ड अकाउंटंट श्री प्रणव अष्टीकर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सर्वांना सोप्या भाषेत समजून सांगताना त्यामध्ये त्यांनी मागणी, उत्पादन व पुरवठा हे चक्र ज्यांना समजले त्यांना कोणताही अर्थसंकल्प समजणे सोपे आहे, तसेच कुठल्याही देशाचे बजेट ही त्या देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. तसेच कृषी, रोजगार निर्मिती, मनुष्यबळ विकास व संरक्षण हे देशाच्या अर्थसंकल्पाचे महत्त्वाचे घटक आहेत तसेच अर्थसंकल्प हा अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा अशी आशा व्यक्त केली.
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांनी श्री प्रणव आष्टीकर यांच्या केंद्रीय अर्थसंकल्पना बाबतच्या विश्लेषणावर समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाकरिता भद्रावती येथील श्री शेखर सिंग, दिनेश काटकर, अविनाश सिद्धमशेट्टीवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक डॉ. गजेंद्र बेदरे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक लेफ्टनंट सचिन श्रीरामे यांनी केले.
या कार्यक्रमाकरिता भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती अंतर्गत सर्व शाळा, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.