भद्रावती (वि.प्र.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर, तालुका क्रीडा कार्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावतीत शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका क्रीडा संकुल च्या मैदानात झालेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती हा संघ विजयी झाला. यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती च्या संघाने लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या संघाचा एकतर्फी पराभव करून विजय संपादन केले व तालुक्यात प्रथम स्थान पटकाविले.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील हॉलीबॉल चा संघ तालुक्यात अव्वल स्थानावर असून त्याची निवड जिल्हा स्तरावर झालेली आहे. चंद्रपूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत हा संघ भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. विजयी झालेल्या संघाचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष, डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण, प्राध्यापक किशोर ढोक, माधव केंद्रे, डॉ ज्ञानेश हटवार, डॉ प्रशांत पाठक, किसन पत्तीवार, शुभम सोयाम, समस्त शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले, व पुढील क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथील हॉलीबॉल च्या विजय संघा मध्ये शर्विल हटवार, गोपाल दडमल, पार्थ दोडके, साहिल शेट्टी, प्रद्युम्न ठाकरे, प्रणव कारेकर, पियुष नागपुरे, गौरव ढवस, गीतेश नागपुरे, सम्यक पाटील , क्रिष्णा गावंडे, आर्यन भडके या खेळाडूंचा सहभाग होता.