यशवंतराव शिंदे उच्च प्रा.विद्यालय भंगाराम वार्ड येथे जन्माष्टमी उत्सव साजरा .!
भद्रावती (वि.प्र.) : येथील यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय भंगाराम वार्ड ,येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीच्या संचालिका मा. सौ.रोशनी कार्तिक शिंदे मॅडम होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून बाल साहित्यीक मा.श्री.शालिक दानव सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे होते.
या निमित्ताने शालेय विद्यार्थींचे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्यें वेशभुषा स्पर्धां, राखी बनविणे स्पर्धा, मटका सजावट स्पर्धांचा समावेश होता.
वेशभुषा मध्ये कु. मायल गेडाम, गणेश सिडाम. राखी बनविणे स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक श्रीकांत जथाडे, द्वितीय क्रमांक दिपा झांझोटे. मटका प्रदर्शनी मध्ये प्रथम क्रमांक जानवी शेंडे, दि्वतीय क्रमांक डिंपल साहू या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.सौ.रोशनी कार्तिक शिंदे मडॅम यांनी बाल अत्याचारावर संरक्षणात्मक. अशी माहिती देऊन पालक व बालकांनी या प्रसंगातून कसे सावध असायला हवे अशी मौल्यवान माहिती दिली. तसेच प्रमुख अतिथी मा.श्री.दानव सरांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी पर काल्याच्या महत्वावर माहिती देऊन कृष्णाच्या बाल लिलाची बोधात्मक माहिती दिली आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे संचालन सौ. पपिया बिश्वास मॅडम यांनी .तर आभार प्रदर्शन श्री.गणेश घोरूडे सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद तसेच विद्यार्थांनी अथक परिश्रम घेतले.