महाराष्ट्रात बारावीपर्यंत सर्वच वीद्याशाखेत मराठी विषय अनिवार्य करावा .!

राज्यस्तरीय सभेत मान्यवरांचा सूर .!

पुणे (वि.प्र.) : कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची महत्वपूर्ण राज्यस्तरीय सभा आभासी पध्दतीने दि. ७ ऑगष्ट २०२४ रोज संपन्न झाली. या सभेत शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण विषयांवर विचार मंथन करण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषयी शिक्षक महासंघाची राज्यस्तरीय सभा दिनांक ७ ऑगस्ट, २०२४ ला संपन्न झाली. या सभेत राज्याध्यक्ष, सुनीलजी डिसले, (बारामती) कार्याध्यक्ष, संपतराव गर्जे, (पुणे) उपाध्यक्ष, डॉ प्रतिभा विश्वास, (मुंबई) यांनी मार्गदर्शन केले. या सभेत नवीन शैक्षणिक धोरणात महाराष्ट्रात मराठी विषय बारावीपर्यंत सर्व विद्याशाखेत अनिवार्य करावा, यासाठी महासंघाने राज्य शासनाकडे व प्रशासनाकडे पाठपुरावा करावा असे ठरविण्यात आले. मराठी विषयाला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच संघटनात्मक बांधणी अधिक घट्ट करून महासंघाचे कार्य विस्तारीत करावे. आपल्या विषय शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालयात आपल्या महासंघामार्फत समस्या निवारण सभा आयोजित करावी याविषयी चर्चा करण्यात आली.
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्रातील तमाम कनिष्ठ महाविद्यालयात मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांना एकसंघ केले असून महासंघाचे जवळपास ५००० सदस्य संघटित झालेले आहेत. उर्वरित मराठी विषय शिक्षक याना संघटनेचे सदस्य करण्यावर भर दिला जाईल.
या सभेकरिता सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य, प्रत्येक जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. सभेमध्ये सर्वच विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. अभ्यासक्रम निश्चित करताना 'अभ्यासक्रम हा विद्यार्थी केंद्रीत असावा' यासाठी सुद्धा महासंघाने अभ्यास मंडळाशी चर्चा करावी असे ठरविण्यात आले. राज्य कार्यकारिणी व जिल्हा प्रतिनिधींची संघटनात्मक कार्यासाठी कार्यकारिणीत फेरबदल करण्यासंबंधीही चर्चा करण्यात आली.
या राज्यस्तरीय सभेचे प्रस्ताविक बाळासाहेब माने मुंबई, सचिव, मराठी विषय शिक्षक महासंघ यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन डॉ ज्ञानेश हटवार जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ पांडुरंग कंद पुणे, समन्वयक महाराष्ट्र राज्य यांनी केले. या सभेत समस्त राज्य कार्यकारणी सदस्य, तसेच सर्वच जिल्हा प्रतिनिधी मिळून जवळपास ५० च्या मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".