बल्लारपुर (का.प्र.) : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा बालुभाऊ धानोरकर यांची संसदीय कोळसा, खाण आणि स्टील समितीच्या सदस्य म्हणून केंद्र सरकारने नुकतीच नियुक्ती केली आहे. चंद्रपूर जिल्हा "ब्लॅक गोल्ड" जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातही अनेक कोळसा खाणी सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. चंद्रपूर महानगरात स्टील प्लांटदेखील आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या संसदीय कोळसा, खाण आणि स्टील समितीच्या सदस्य म्हणून झालेल्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कोळसा खाण आणि स्टील संदर्भातील सर्व समस्यांचे निराकरण होईल अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना आहे. दिवंगत खासदार बालुभाऊ धानोरकर देखील याच समितीचे सदस्य होते. ही एक खास बाब आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदारांना सलग दोन वेळा संसदीय कोळसा, खाण आणि स्टील समितीचे सदस्य पद मिळाले आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या नवीन नियुक्तीसाठी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
खासदार प्रतिभा बालुभाऊ धानोरकर यांची संसदीय कोळसा, खाण आणि स्टील समितीच्या सदस्य पदी नियुक्ती .!
byChandikaexpress
-
0