मराठी विषय शिक्षक महासंघाची कार्यकारिणी महत्त्वपूर्ण सभा .!
बल्लारपुर (का.प्र.) : दि.२९ सप्टेंबर २०२४ रोज रविवारला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने एकदिवसीय राज्यस्तरीय जिल्हा प्रतिनिधी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मराठी साहित्य विद्यापीठ, रिध्दपूर (अमरावती) चे पहिले कुलगुरु डाॅ. अविनाश आवलगावकर होते, तर प्रमुख उपस्थितांमध्ये प्रा. सुधीर भोसले सहसचिव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे, महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले, सचिव प्रा. बाळासाहेब माने, कार्याध्यक्षा डाॅ. मनीषा रिठे, उपाध्यक्ष डाॅ.ज्ञानेश हटवार, उपाध्यक्ष डाॅ.प्रतिभा बिश्वास, कोषाध्यक्ष प्रा.सजय लेनगुरे, कोषाध्यक्ष प्रा.दिलीप जाधव, जिल्हा प्रतिनिधी प्रा.यशवंत पवार (यवतमाळ), प्रा. सुरेश नखाते (नागपूर), प्रा.पवन कटरे (गोंदिया) या शिवाय संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रतिनिधीची उपस्थिती होते.
यावेळी उद्घाटकीय मार्गदर्शन करताना मराठी भाषेच्या संबंधित , मराठी संस्कृती रुजवण्याचं काम, संवर्धन व संगोपन करण्याचं काम हे मराठी विषय शिक्षक महासंघ करित आहे, याचा अभिमान असल्याचे वक्तव्य केले.
आपल्या प्रास्ताविकेमधून मराठी विषय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा.बाळासाहेब माने (मुंबई) हे बोलत होते. आपल्या मनोगतामधून ते म्हणाले की, मराठी विषय शिक्षकांच्या समस्येसंबधी महाराष्ट्रातील सर्व विषय शिक्षक एकजूट राहून महासंघाला बळकट करण्याचे काम करुया. या प्रसंगी मराठी विषयाच्या अनुषंगाने महत्वाचे ठराव मांडून त्या ठरावाला अनुमती सुध्दा घेण्यात आली. यावेळी मराठी विषय शिक्षक महासंघाच्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. महासंघाच्या कामासाठी कर्तव्यरजा देण्यात यावी असाही ठराव घेण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने नावानिक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यातून सर्व जिल्हा प्रतिनिधी व समस्त महासंघाचे कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पांडुरंग कंद यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा बापू खाडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गरवारे कॉलेज च्या प्राध्यापक मंडळींनी परिश्रम घेतले.